Mumbai Accident News : स्कुटीवरुन फिरायला निघालेल्या मैत्रिणींची कायमची ताटातूट, स्पीड ब्रेकरवरुन गाडी घसरली अन्...

Mulund Accident: या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दिशाचा जागीच मृत्यू झाला.
Mulund Accident
Mulund AccidentSaam Tv

Mumbau News: आपल्या मुलीला स्कुटी चालवायला देणं एका वडिलांना चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईच्या मुलुंडमध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये (Bike Accident) एका 12 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मुलुंडच्या केळकर कॉलेज (Kelkar College) परिसरात घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Mulund Accident
Borivali Crime: दोघांचा एकीवर जीव जडला अन् घडलं भयंकर; दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या, असा झाला पर्दाफाश

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये राहणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीने आपल्या मैत्रिणीसोबत फेरफटका मारण्यासाठी वडिलांकडून स्कुटीची चावी घेतली. या मुलीने तिची 12 वर्षांची मैत्रीण दिशाला सोबत घेतले. या दोघी स्कुटीवरुन मुलुंडच्या केळकर कॉलेज परिसरात असलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्यावर स्कुटी चालवत होत्या. त्याचवेळी अचानक स्पीड ब्रेकरवरून त्यांची स्कुटी स्लिप होऊन थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. या अपघातामध्ये स्कुटीवर मागे बसलेली दिशा रस्त्यावर पडली.

Mulund Accident
Bhayandar News: अमानुषतेचा कळस! संडे मंडेची स्पेलिंग येत नसल्याने ६ वर्षीय मुलाला बेदम मारहाण; पोलिसांत तक्रार दाखल

गंभीर जखमी झालेल्या दिशाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या दिशाच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीचे वडील अमर डोंबे यांच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी अमेर डोंबेंविरोधात गुन्हा दाखल केला. अमर डोंबे यांनी मुलगी अल्पवयीन असताना देखील तिला गाडी चालवण्याची परवानगी दिली. त्यामुळे अमर डोंबे हेच या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला. त्यानंतर नवघर पोलिसांनी मोटर वाहन अ‍ॅक्ट अंतर्गत नवघर पोलीसांनी अमर डोंबेंविरोधात गुन्हा दाखल केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com