Mumbai : निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने संपविले जीवन; हत्या की आत्महत्या ?

मुंबईतील (Mumbai) वांद्रे पूर्वेकडील निर्मल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
mumbai crime news
mumbai crime news saam tv

संजय गडदे

Mumabai Crime News : मुंबईतील (Mumbai) वांद्रे पूर्वेकडील निर्मल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या निवृत्त महिला पोलीस अधिकारी यांचं नाव वैशाली विलास शेलार आहे. त्या 58 वर्षांच्या होत्या. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

mumbai crime news
Breaking News : मुंबईत चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील निर्मल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या साईकृपा इमारतीमध्ये निवृत्त अधिकारी राहत आहेत. त्या मृत महिलेचे पती हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. तसेच त्या महिला या घरात एकट्याच राहत होत्या. कोणताही संशयास्पद प्रकार नाही. शवविच्छेदनानंतर त्या महिलेच्या मृत्यूचे कारण समोर येईल.

mumbai crime news
पार्सल घेवून आलेल्या डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचं चुंबन, पुण्यातील धक्कादायक प्रकार

निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या पत्नी या देखील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह घरातच होता. सदर निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याने शेजारच्या लोकांनी याबाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यावेळी घरात पोलिसांना निवृत्त महिला पोलीस अधिकारी वैशाली यांचा मृतदेह दिसला.

पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला. निवृत्त महिला पोलीस अधिकारी वैशाली यांची हत्या की आत्महत्या हे शवविच्छेदनातून समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com