
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. मुसळधार पावसामुळे येथे एक चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरल्याचे वृत्त आहे. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर होते.
डिजिसीएने दिलेल्या माहितीनुसार, VSR Ventures Learjet 45 विमान VT-DBL विशाखापट्टणमहून मुंबईला उड्डाण करत मुंबई विमानतळावर धावपट्टी 27 वर लँडिंग करताना धावपट्टीवर कोसळलं. (Latest Marathi News)
या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. डीजीसीएने सांगितले की, हे चार्टर्ड विमान लँडिंग करत असताना मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील दृश्यमानता 700 मीटर होती. अपघातानंतर काही वेळातच पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 8 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान दुर्घटना संध्याकाळी 5 वाजल्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर दोन्ही धावपट्टी काही काळ बंद करण्यात आली होती. संध्याकाळी 6.47 च्या सुमारास एका धावपट्टीवर ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात आले.
सायंकाळी 5.08 वाजता हा अपघात झाल्याचे मुंबई विमानतळाने निवेदनाद्वारे सांगितले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.