Mumbai News : 'अंधेरीचा राजा' गणपती मंडळाचा भक्तांसाठी 'ड्रेस कोड' जारी, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Andhericha Raja Ganpati : मागील वर्षीही मंडळाने भक्तांसाठी ड्रेसकोड जारी केला होता.
Andhericha Raja Ganpati
Andhericha Raja Ganpati Saam TV

संजय गडदे

Mumbai News :

मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच मोठी मंडळे आता गणेशोत्सवासाठी सज्ज झाली आहेत. गणपती विराजमान होण्याआधीच अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळ चर्चेत आलं आहे.

अंधेरीचा राजा गणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे. आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. मात्र गपणतीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी मंडळाने ड्रेसकोड जारी केल्याने नव्या वादा तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Mumbai News)

Andhericha Raja Ganpati
Pune News : पुण्यात अन्न व औषध प्रशासन विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये, भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर

मागील वर्षीही मंडळाने भक्तांसाठी ड्रेसकोड जारी केला होता. यंदाही भक्तांना जीन्स पॅन्ट, हाफ पॅन्ट आणि शॉर्ट स्कर्ट घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Andhericha Raja Ganpati
Hartalika 2023 : हरतालिकाचा उपवास सोडण्यासाठी घरच्या घरी हे 2 पारंपारिक पदार्थ बनवा, पाहा रेसिपी

मागील 58 वर्षापासून अंधेरी पश्चिमेकडील आझादनगर परिसरात या गणपतीची स्थापना केली जाते. मागील वर्षी याच मुद्द्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. मंडळाच्या या निर्णयाला अनेक संघटनांकडून विरोधी झाला. मात्र मंडळ आपल्या या निर्णयावर ठाम आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com