CNG Rate : महागाईच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजीच्या दरात कपात, जाणून घ्या नवे दर

मुंबई आणि मुंबई उपनगरात सीनजीच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
CNG pump
CNG pump Saam Tv

Mumbai News : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरात सीनजीच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत उद्यापासून सीएनजी गॅस ८७ रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील. (Latest Marathi News)

CNG pump
Economic Survey 2023 : जगात मंदी, पण भारताची चांदी; आर्थिक विकासासह रोजगाराच्या धन-धना-धन संधी!

वाढत्या महागाईमुळे अनेकांचे कंबरडे मोडले होते. तर सीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यामुळे वाढत्या सीएनजी दरामुळे सामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. याचदरम्यान, पहिल्यांदा सीएनजीचे (CNG) दर कमी करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई शहर परिसरात सीएनजी गॅस ८७ रुपये प्रतिकिलोने मिळणार आहे.

सीएनजी दर कमी केल्यामुळे रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच सामान्य नागरिकांना देखील सीएनजी दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे. मुंबईत (Mumbai) सीएनजी दर ८९.५० रपये होता. तर उद्यापासून सीएनजी दर ८७ रुपये दराने मिळणार आहे. सीएनजीचे नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

CNG pump
PM CARES Fund : पीएम केअर फंड चॅरिटेबल ट्रस्ट, त्याच्यावर सरकारचं नियंत्रण नाही; हायकोर्टात PMO कार्यालयाची माहिती

नोव्हेंबर महिन्यात झाली होती दरवाढ

महानगर गॅस लिमिटेडने नोव्हेंबर महिन्यात सीएनजी गॅस दरात वाढ केली होती. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात ३.५० रुपयांनी दरवाढ केली होती. तर घरगुती वापराच्या पीएनजी दरात दीड रुपये प्रति एससीएमची करण्यात आली होती.

दरवाढीमुळे मुंबईत सीएनजीचा दर ८९.५० रुपये प्रति किलो इतका झाला होता.त्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com