Mumbai News : शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक

Crime News : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांचं नाव देखील या प्रकरणात पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
Pravin Darekr
Pravin DarekrSaam Tv

संजय गडदे

मुंबई : राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना एकमेकांसोबत राज्याच्या कारभाराचा गाडा हाकत आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर काहीसं उलट चित्र दिसत आहे.

कारण मुंबईत भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांचं नाव देखील या प्रकरणात पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या दहिसर विधानसभा क्षेत्रात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बॅनर लावण्यावरून वाद झाला. या वादातून शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात भाजपा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pravin Darekr
CCTV Footage : थरार! ओव्हरटेक करुन धडक देत गाडी थांबवली, मग गोळीबार अन् कोयत्याने वार VIDEO

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी जखमी कार्यकर्ता बिभीशन वारे याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. या हल्ल्याप्रकरणी आता दहिसर पोलीसांनी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

हल्ला केला त्यांना सोडलं जाणार- प्रवीण दरेकर

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी आम्ही बातचित केली आहे. हा राजकीय हल्ला आहे. असा पद्धतीने राजकीय दबाव टाकणे हे चुकीचे आहे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना सोडलं जाणार नाही. पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. दोषींवर कारवाई होईल, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Pravin Darekr
Satara News : साताऱ्यातील पाटण तालुक्यात गोळीबार, घटनेत २ ठार; परिसरात खळबळ

राज सुर्वे यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर हल्ला

प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर हल्ला झाला आहे, असा आरोप जखमी बिभीशन वारे यांनी केला. मुलं जमा करून प्लॅनिंग करून माझ्यावर हल्ला करण्यास सांगितलं.

यापुढे माझ्यावर किंवा माझ्या परिवारावर हल्ला झाला तर यांच्या मागे राज सुर्वे, प्रकाश सुर्वे आणि कौस्तुभ मामुनकर हे तीन जण असतील, असा थेट आरोप बिभीशन वारे यांनी केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com