Fire In Mumbai : मुंबईच्या अंधेरी परिसरात भीषण आग; अग्नीशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील अंधेरीमध्ये (Andheri) आगीचं वृत्त समोर आलं आहे. अंधेरीमधील एका इमारतीला आग (Fire) लागली आहे. या आगीमुळे हवेत आगीच्या धुराचे लोळ पसरले आहेत. या आगीचं नेमकं अद्याप स्पष्ट झाले नाही
Fire in mumbai
Fire in mumbai saam tv

रुपाली बडवे

मुंबई : मुंबईतील अंधेरीमधून (Andheri) आगीचं वृत्त समोर आलं आहे. अंधेरीमधील एका इमारतीला आग (Fire) लागली आहे. या आगीमुळे हवेत आगीच्या धुराचे लोळ पसरले आहेत. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच दोन पाण्याचे टँकर देखील घटनास्थळी आहेत. ( Mumbai Fire News In Marathi )

Fire in mumbai
Sharad Pawar : राज्यातील पूरपरिस्थितीवरून शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...

अंधेरीतील या आगीचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये या इमारतीच्या आजूबाजूला काळ्या रंगाचे लोळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे धूर संपूर्ण परिसरात पसरत आहे. या इमारतीत किती जण अडकले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Fire in mumbai
Mumbai University। मुंबई विद्यापीठातील वसतिगृहाला वीर सावरकरांचं नाव!; पाहा व्हिडिओ

दरम्यान, आगीची ही घटना अंधेरी येथील एका स्पोर्ट कॉमप्लेक्सच्या मागे लागली आहे. या आगीमुळे धुराचे लोळ हवेत मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान, पोलिसांव्यतिरिक्त जल विभाग देखील घटनास्थळी दाखल झाला आहे. याआधी देखील मुंबईत आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या आगीच्या घटनेत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. सर्वात मोठी आग ही जानेवारी महिन्यात कमला इमारतीला लागली होती. भाटीया रुग्णालयाजवळील कमला इमारतीच्या २० व्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत २८ जण जखमी झाले होते. तर ६ लोकांचा मृत्यू झाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com