Kurla Fire News: कुर्ला झोपडपट्टी परिसरात भीषण आग; 3 झोपड्या जळून खाक, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी

Mumbai's Kurla Fire News: कुर्ला परिसरातील कुरेशी नगर पूर्वेकडं असलेल्या बर्मा सेल लाईन झोपडपट्टीला भीषण शुक्रवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.
Mumbai's fire broke out in kurla slum area Shocking incident
Mumbai's fire broke out in kurla slum area Shocking incidentSaam TV News

Mumbai's Kurla Fire News:

राज्यात एकीकडे दहीहंडी सणाचा उत्साह ताजा असताना दुसरीकडे मुंबईतील कुर्ला परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुर्ला परिसरातील कुरेशी नगर पूर्वेकडं असलेल्या बर्मा सेल लाईन झोपडपट्टीला भीषण शुक्रवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

Mumbai's fire broke out in kurla slum area Shocking incident
Pune Breaking News: पुण्यात धावत्या PMP बसवर कोसळलं भलमोठं झाड; प्रवाशांची पळापळ, चालक जखमी

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण (Kurla Fire) मिळवण्यात यश आलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत ३ झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगर येथे बर्मा सेल लाईन झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतील एका झोपडीला शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचं मोठा गोंधळ उडाला. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Mumbai's fire broke out in kurla slum area Shocking incident
Pune News: दहीहंडी फुटताच आप्पा बळवंत चौकात राडा; ढोल ताशा पथक अन् गोविंदामध्ये तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

मात्र, क्षणात आगीने रौद्ररुप धारण केलं आणि बाजूच्या दोन झोपड्याही आगीच्या विळख्यात आल्या. दरम्यान, या घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

सुदैवाने या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलं आहे. परिसरातील नागरिकांना घटनास्थळावरुन सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com