
सचिन गडदे
Latest Mumbai News : सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते श्रीकांत देशमुख यांच्यासोबत लग्न झाल्याचा दावा करणारी तरुणी निर्मला यादव हीने एक फेसबुक पोस्ट करून आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली आहे. या आत्महत्येस भाजप नेते रंजीत निंबाळकर, चंद्रकांत दादा पाटील, शशिकांत देशमुख आणि श्रीकांत यांची पत्नी जबाबदार असेल असेही तिने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटला आहे.
निर्मला यादव आणि भाजप (BJP) नेते श्रीकांत देशमुख यांच्यात मागील वर्षभरापासून वाद सुरू आहे. श्रीकांत देशमुख यांनी आपली फसवणूक केल्याचा दावा या तरुणीने केला होता. काही महिन्यांपूर्वीच एका लॉजवर विचित्र अवस्थेत असतानाचा क्षण तिने फेसबुक (Facebook) लाईव्हवर देखील दाखवला होता. मात्र यानंतर निर्मला यादव हिच्यावरच मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये खोटा हनीट्रॅप, बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र आज निर्मला यादवने एक फेसबुक पोस्ट करत कुलस्वामिनी तुळजापूर भवानी मातेच्या साक्षीने श्रीकांत देशमुख यांच्यासोबत पुण्यात (Pune) दोन पंडितांच्या साक्षीने लग्न झाल्याचा दावा केला आहे. शिवाय त्या दोन्ही पंडितांनी सोलापूर (Solapur) पोलिसांना जबाब लिहून देताना श्रीकांत देशमुख आणि निर्मला यादव यांचे लग्न झाल्याचं कबूल केले आहे.
येत्या 27 फेब्रुवारीला लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. जर माझ्या नवऱ्याने 27 फेब्रुवारीपर्यंत मला घरी नांदायला नेलं नाही तर मी माझं जीवन संपवणार आहे असं निर्मला यादव लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शिवाय श्रीकांत देशमुख यांची मदत करणारे रणजीत निंबाळकर, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) श्रीकांत देशमुख यांचा मोठा भाऊ शशिकांत देशमुख आणि श्रीकांत यांची पहिली पत्नी आत्महत्येस जबाबदार राहतील असेही निर्मला यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
निर्मला यादव हिची फेसबुक पोस्ट
आमची कुलस्वामिनी तुळजापुर भवानी मातेच्या साक्षीने आमचे लग्न पुण्या मध्ये दोन पंडितांच्या साक्षीने झाले आहे , आणि त्या पंडितांनी सोलापूर पोलिसांना जबाब लिहून दिला आहे की श्रीकांत चे आणि माझे लग्न स्वाता त्या पंडितांनी लावुन दिले आहे , मी सुहासिनी सारखीच मरणार.. माझ्या सुहासिनी लेण्याच्या समोर कोणतीच ताकद मी मानत नाही , या येत्या २७ फेब्रुवारी ला आमच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होत आहे, जर माझ्या नवऱ्याने स्वता येऊन या २७ फेब्रुवारीपर्यंत जर मला घरी नांदायला घेऊन नाही गेले तर मी स्वतः माझे आयुष्य संपवणार आहे , मी एक सुहासिंन आहे माझ्या वरती खोटा हनीट्रॅप माझी खोटी बदनामी , यासर्व गोष्टी ला मदत करणारे रणजीत निंबाळकर आणि चंद्रकांत दादा पाटील आणि श्रीकांत देशमुख यांचा मोठा भाऊ शशीकांत देशमुख आणि श्रीकांत ची पहिली बायको माझ्या मरणाला जिम्मेदार असतील.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.