Mumbai News: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता भलताच धंदा! मुंबईच्या वांद्रेतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime: गुप्त माहितीच्या आधारे पोलीस कर्मचार्‍यांनी रात्री उशिरा स्पावर छापा टाकत ही कारवाई केली.
Mumbai News
Mumbai Newssaam tv

>> संजय गडदे, मुंबई

Prostitution In Mumbai : समाजसेवा शाखेने (अंमलबजावणी) वांद्रे येथील स्पामध्ये सुरु असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे स्पा सेंटर खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे प्रकरण खार पोलिस स्टेशनकडे सोपवण्यात आले आहे.

खार भागातील वॉटरफिल्ड रोडवरील आरस बिल्डिंगमध्ये असलेल्या थाई स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस कर्मचार्‍यांनी 4 मे रोजी रात्री उशिरा स्पावर छापा टाकत ही कारवाई केली.

Mumbai News
Sharad Pawar News: 'कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचे सरकार येणार..' शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले; देशात भाजपची...

पोलिसांनी स्पामधून पाच तरुणींची सुटका केली, त्यापैकी एक थाई नागरिक आहे, तर इतर चार ईशान्येकडील राज्यांतील आहेत. एका महिला दलालाला पुढील तपासासाठी हजर राहण्यासाठी सीआरपीसी अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे, तर एक पुरुष दलाल फरार असून त्याचा शोध खार पोलीस घेत आहे. (Mumbai News)

Mumbai News
Maharashtra Politics: पुन्हा राजकीय भूकंप! संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार, तारीखही ठरली.. भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पा मसाज पार्लरमधून मोबाईल फोन, कंडोम आणि आरोपींकडून 17,500 आणि स्क्रीनशॉट देखील ताब्यात घेतले आहेत. स्पा खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हे प्रकरण खार पोलिस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. अनैतिक तस्करी (प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com