Mumbai News : मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट? अज्ञात व्यक्तीकडून आणखी एक धमकी वजा फोन, पोलीस यंत्रणा सतर्क

मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आणखी एक धमकी वजा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
mumbai news
mumbai news Saam tv

मुंबई : मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आणखी एक धमकी वजा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने मुंबईतील कुर्ला परिसरात पुढील १० मिनिटात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगत फोन कट केला. या धमकी वजा फोनमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई (Mumbai) पोलीस नियंत्रण कक्षाला आणखी एक धमकी वजा फोन आल्याचं वृत्त समोर आलं आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या (Police) नियंत्रण कक्षेला फोन करून कुर्ला परिसरात पुढील १० मिनिटात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगत फोन कट केला आहे. या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क होत सर्वत्र शोधाशोध सुरू केली आहे. पोलीस तपासात संशयास्पद कुठलीही गोष्ट आढळून आलेली नाही. पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

mumbai news
Eknath Khadse : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? महसूल विभागाने घेतला मोठा निर्णय

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षेला व्यक्तीने धमकी वजा फोन त्याचा मोबाईल बंद केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र मागील अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडे असे फोन वारंवार येत आहेत.

mumbai news
Mumbai Crime : मोलकरणीनेच मारला घरातील दागिन्यांवर डल्ला; लाखोंचा मुद्देमाल केला लंपास

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ईमेल आयडीवरही आला होता धमकीचा फोन

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईला पुन्हा दहशदवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली . NIA या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ईमेल आयडीवर हा मेल आला होता. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांना सतर्ककेचा इशारा देण्यात आला होता.

NIA कडून मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षालाही गुरूवारी रात्री १२ च्या सुमारास हा मेल पाठवण्यात आला होता. त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मेल करणाऱ्याने आपण तालिबानी असून तालिबाणी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशावर चालत असल्याचा उल्लेख केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com