Incident In Front Of Mantralaya: मंत्रालयासमोर विष प्यायलेल्या धुळ्याच्या महिलेचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू

Mumbai Latest News : मुंबईत मंत्रालयासमोर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
Mantralaya mumbai News
Mantralaya mumbai NewsSAAM TV

Mumbai News: मुंबईत मंत्रालयासमोर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. शीतल गादेकर असे ४६ वर्षीय महिलेचे नाव आहे. पीडित महिलेची धुळ्यात ९ गुंठे जागा होती. ती एका व्यक्तीने हडप केली होती, असा तिचा आरोप होता. त्याविरोधात ती दाद मागण्यासाठी सरकार दरबारी आली होती, अशी माहिती मिळते. (Maharashtra News)

शीतल या काल, २७ मार्च रोजी मुंबईत (Mumbai) मंत्रालयासमोर आल्या होत्या. त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तातडीने त्यांना जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज, २८ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला.

Mantralaya mumbai News
Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका, दोन वर्ष वकिली करता येणार नाही

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील (Dhule) ४६ वर्षीय शीतल गादेकर यांची धुळ्यात ९ गुंठे जागा होती. ही जागा एका व्यक्तीने हडप केली होती. त्याविरोधात दाद मागण्यासाठी ती सरकार दरबारी आल्या होत्या. नैराश्य आल्याने त्यांनी किटकनाशक औषध पिऊन मंत्रालयासमोर (Mantralaya) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन, जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते.

Mantralaya mumbai News
Pune News : ३० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला अटक

शीतल यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते. आज, मंगळवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत. मंत्रालयाजवळ येण्याआधीच किटकनाशक औषध पिऊन त्या आल्या असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

शीतल गादेकर २०२० पासून सातत्याने पाठपुरावा करून जागेसंदर्भात आपल्याला न्याय मिळावा, असे त्यांचे म्हणणे होते. गेल्या महिन्यात त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. नैराश्य आल्याने त्यांनी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com