Mumbai Stunt Video : मुंबईत जीवघेणी स्टंटबाजी; तरूण बसला भरधाव कारच्या बोनेटवर, व्हिडिओ व्हायरल

पोलिसांकडून या स्टंटबाजांवर कारवाई केली जाते. याचदरम्यान, मुंबईतील असाच एका जीवघेण्या व्हिडिओ समोर आला आहे.
Mumbai Stunt Video
Mumbai Stunt VideoSaam tv

संजय गडदे

मुंबई : मुंबईत लोकलच्या दारात लटकणारे व स्टंटबाजी करणारे महाभाग तुम्ही पाहिलेच असतील. लोकल ट्रेनच्या दारात लटकून अपघात होऊन अनेकांनी जीव देखील गमावले आहेत. तर काही महाभाग ट्रेनच्या छतावर देखील जाऊन प्रवास करतात. मात्र, याच स्टंटबाजांना पोलिसांनी लगाम लावला आहे.

लोकलच्या दरवाजांवर स्टंटबाजी करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जाते. याचदरम्यान, मुंबईतील असाच एका जीवघेण्या व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील (Mumbai) मालवणी भागातील वीर अब्दुल हमीद मार्गावर एक तरुण अति वेगवान वाहनाच्या बोनेटवर बसून काही कसरती करताना दिसत आहे. या व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसतंय की चार चाकी वाहनाच्या बोनटवर हा तरुण स्टंट करताना दिसत आहे. असे जीवघेणे स्टंट करताना या तरुणाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता.

Mumbai Stunt Video
Sheetal Mhatre : Viral Morph Video प्रकरणात ठाकरे गटावर आरोप करणाऱ्या शितल म्हात्रे कोण आहेत?

आपल्या जीवाची पर्वा न करता हा तरुण असे खतरनाक स्ंटट करताना पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईत लोकलच्या दारात लटकणारे व स्टंटबाजी करणारे महाभाग तुम्ही पाहिलेच असतील. मुंबईतील मालवणी भागातील असाच एका जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

दरम्यान, तरुणाचा हा जीवघेणा स्टंट सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईच्या मालवणी परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे. आता पोलिसही असे जीवघेणे स्ंटट करणाऱ्या या तरुणाचा शोध घेत आहेत. सोशल मीडियावर स्टंटबाजावर नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे. खुलेआम रस्त्यावर स्टंट करताना रस्त्यावर मोठा अनर्थ झाला असता, असे नेटकऱ्यांक़ून म्हटले जात आहे.

दरम्यान, राज्यात रस्ते अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांचा मृत्यू होता. रस्ते अपघातात दरवर्षी निष्पाप पादचाऱ्यांचाही मृत्यू होतो. तर रस्ते अपघातात बहुतांश प्रवाशांचा मृत्यू होतो. त्यामुळे राज्यातील वाढते अपघात नागरिकांच्या चिंतेचा विषय आहे. याचदरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्याने नेटकऱ्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com