Pune Crime News: पुण्यातील २ दहशतवाद्यांकडून धक्काकायक माहिती उघड; मुंबईची सुरक्षा वाढवली

या दहशतवाद्यांकडे मुंबईतील छाबड हाऊसचे फोटो आढळल्याने मुंबईची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv

अक्षय बडवे

Pune News: पुण्यातून २ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दोन संशयित दहशवाद्यांकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या लॅपटॉप, मोबाईलमध्ये ५०० जी बी डेटा आढळून आला आहे. या दहशतवाद्यांकडे मुंबईतील छाबड हाऊसचे फोटो आढळल्याने मुंबईची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील संशयित दहशतवाद्याकंडे मुंबईची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या लॅपटॉप, मोबाईलमध्ये ५०० जी बी डेटा आढळला आहे.

दोघांच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये गुगल लोकेशनचे स्क्रीनशॉट सापडले आहेत. या लोकेशनच्या स्क्रीनशॉटमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणे सापडले आहेत. याचबरोबर मुंबईतील छाबड हाऊसचे फोटो सापडले आहेत.

Pune Crime News
Cyber Crime News : सायबर गुन्हेगारांच्या रडारवर अधिकारी; आतापर्यंत आठ अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते, केली पैशांची मागणी

दरम्यान, २००८ साली झालेल्या २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात चाबड हाऊस हे एक मुख्यलक्ष्य होते. दहशतवादी विरोधी पथकाने पुण्यातून मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी त्यांच्याकडे सापडलेले ड्रोनने विविध जागेचे चित्रीकरण करायचे. त्या दोघांकडून बॉम्ब बनवण्याचे सर्किट देखील आढळून आले आहे.

दरम्यान, दोघे दहशतवादी विविध प्रकारचे पुस्तक वाचून, युट्यूबचे व्हिडिओ पाहून प्रेरित व्हायचे. तिसऱ्या फरार दहशतवाद्याचा शोध अद्याप सुरू आहे. तिसऱ्या आरोपीने या दोघांना आश्रय दिला होता. तर रत्नागिरीमधून अटक केलेल्या व्यक्तीने त्यांना आर्थिक मदत केली होती.

Pune Crime News
Ahmednagar Crime News : युवकांनी दुचाकीवरून येत बस थांबविली; बसमध्ये बसलेल्या दोन मुलींना केली मारहाण

चबड हाऊसभोवती सुरक्षा वाढवली

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्याकडे मुंबईतील छाबड हाऊसचे फोटो आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोघांकडे कुलाबा येथील चबड हाऊस इमारतीचे काही फोटो त्यांच्याकडून मिळाले आहेत. यामुळे कुलाबा येथील चबड हाऊसभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईचीही देखील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com