प्राण्यांचे १२०० किलो मांस जप्त; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या, गोमांस असल्याचा पोलिसांना संशय

मुंबईत प्राण्यांचे मांस ठेवण्याचा भयंकर प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
प्राण्यांचे १२०० किलो मांस जप्त; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या, गोमांस असल्याचा पोलिसांना संशय
culprit arrested Saam Tv

मुंबई : येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत प्राण्यांचे मांस (Animal Beef) ठेवण्याचा भयंकर प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गोमांस ठेवल्याप्रकरणी (Three culprit arrested) तीन आरोपींना अटक केली आहे.

culprit arrested
PM मोदींवर केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस नेत्याला भोवलं; पोलिसांनी केली अटक, त्यानंतर...

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी १२०० किलो मांस जप्त केला आहे. पोलिसांनी जप्त केलेला मांस गोमांस आहे की अन्य कोणत्या प्राण्याचे आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी सिराज कुरेशी,अन्वर कुरेशी आणि अब्दुल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

culprit arrested
मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, आजची आकडेवारी पाहा

मुंबईत तीन व्यक्तींकडे प्राण्यांचा १२०० किलो मांस सापडल्याने खळबळ माजली आहे. जप्त केलेले मांस गोमांस असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राण्यांचे मांस ठेवणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे गोमांस आहे की, अन्य कोणत्या प्राण्याचे मांस आहे, यासाठी पोलिसांनी नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत. काही इसम प्राणी कापून त्यांचे मांस ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्ळळी धाव घेत तीन आरोपींना अटक केली.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com