Ulhasnagar : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण : अनिक्षा जयसिंघानी पोलिसांच्या ताब्यात (पाहा व्हिडीओ)

मुंबई पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
Amruta Fadnavis News, Ulhasnagar,  aniksha jaisinghani
Amruta Fadnavis News, Ulhasnagar, aniksha jaisinghanisaam tv

Amruta Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis latest news) यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीस अटक करण्यात आली आहे. पाेलिसांनी उल्हासनगर (ulhasnagar) येथून अनिक्षा जयसिंघानी (aniksha jaisinghani latest marathi news) हिला ताब्यात घेतलं आहे. (Breaking Marathi News)

Amruta Fadnavis News, Ulhasnagar,  aniksha jaisinghani
SSC Exam 2023 : दहावीचा गणिताचा पेपर पुण्यात फुटला ? बिबवेवाडी पोलिस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली हाेती. डिझायनर अनिक्षाने तिच्या वडिलांवरील फौजदारी खटला मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देऊ केली असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Amruta Fadnavis News, Ulhasnagar,  aniksha jaisinghani
Nagpur : 'अवकाळी' चा फटका: बॅंकेचं कर्ज कसं फेडणार... घर कसं चालणार..., शेतकरी धायमाेकलून रडले (पाहा व्हिडिओ)

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी उल्हासनगर येथून अनिक्षा जयसिंगानी हिला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या अनिक्षा हिची चौकशी केली जात आहे. डिझायनरच्या वडिलांनी अमृता फडणवीस यांनाही कटात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनूसार अनिक्षा तिच्या वडिलांवर दाखल असलेल्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिली. यानंतर फडणवीस यांनी अनिक्षाचा नंबर ब्लॉक केल्यावर तिने दुसऱ्या नंबरवरून मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून धमकाविल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

डिझायनर अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी उल्हासनगर येथून अनिक्षा जयसिंघानी ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com