पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई पोलिसांचा ईमेल हॅक (व्हिडिओ)

पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई पोलिसांचा ईमेल हॅक
पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई पोलिसांचा ईमेल हॅक (व्हिडिओ)
पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई पोलिसांचा ईमेल हॅक - Saam Tv

मुंबई : पाकिस्तानमधील हँकर्स कडून वारंवार भारतावर कुरघोड्या केल्या जात आहेत. नुकतीच या हॅकर्सनी मुंबई पोलिसांना लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. या पाकिस्तानी हॅकर्सनी मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाचा ईमेल आयडी हॅक करून पोलिसांचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. Mumbai Police email hacked by Pakistani Hackers

मुंबईत सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेता परिमंडळानुसार ५ सायबर कक्षाची स्थापना केली. हे ५ सायबर कक्ष मुंबईच्या वांद्रे सायबर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येतात. पूर्व सायबर विभागात राजेश नागावडे हे कार्यरत असून अचानक त्यांच्या ईमेलहून सर्व सरकारी कार्यालयाना अचानक मेल जाऊ लागले. विशेष म्हणजे हा मेल महाराष्ट्र सायबर विभागाकडून आला असल्याचे भासवण्यात आले होते. या मेलसोबत ए कगुप्त अहवाल नावाने पीडीएफ फाईलही जोडण्यात आली होती.

पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई पोलिसांचा ईमेल हॅक
खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

या मेल मध्ये terrorist behind jk attack gunned down in mumbai असा मजकूर होता. विशेष म्हणजे हा मेल कालांतरानंतर आपसूकच मेल बाॅक्स मधून डिलिट होत होता. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेची माहिती पूर्व सायबर विभागाला देण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तात्काळ हे हॅकिंग रोखले. तपासात हे कृत्य पाकिस्तानी हॅकर्सकडून करण्यातआल्याचे समोर आले आहे.

वेळीच सायबर पोलिसांनी या मेलची माहिती सर्व पोलिस ठाणे आणि अधिक्षकांना दिलेली आहे. अशा प्रकारचा मेल आल्यास तो न उघडण्याच्या सूचना महाराष्ट्र सायबरचे पोलिस उपायुक्त संजय शिंत्रेंनी केल्या आहेत. Mumbai Police email hacked by Pakistani Hackers

हा ईमेल स्पुफींगचा प्रकार आहे. त्यात एखाद्या व्यक्तीच्या नावाचा वापर करून ईमेल पाठवण्यात येतो. पण प्रत्यक्षात हा ईमेल त्या व्यक्तीने पाठवलेला नसतो. असे हॅकर्स प्रॉक्सी सर्वरचा वापर करून असे ई मेल पाठवतात. त्यामुळे कोणत्याही परिसरातून ईमेल आल्याचे भासवले जाऊ शकते. Mumbai Police email hacked by Pakistani Hackers

त्या ईमेलच्या सहाय्याने संगणक हॅक केला जाऊ शकतो, तसेच डाटाही चोरला जाऊ शकतो. हा ईमेल देशभरातील विविध सरकारी विभागांना प्राप्त झाला आहे. त्याबाबत आम्ही तपासणी केली असता पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून त्याची निर्मिती झाल्याचे निष्पन्न झाल्याचे तपासात समोर आले असून महाराष्ट्र सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत, असे शिंत्रे यांनी सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com