Loudspeaker : मुंबईतील दोन मशिदींवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल केला आहे.
Loudspeaker : मुंबईतील दोन मशिदींवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
Masjid BhongaSaam Tv

मुंबई : लाऊडस्पीकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Police) दोन मशिदींच्या ट्रस्टीविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्यात मनसेने मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल केला आहे.

Masjid Bhonga
Raj Thackeray Visit on Pune | राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यात येण्याचं कारण अस्पष्ट | Pune

सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी (Police) कारवाई केली आहे.

सर्वाच्या न्यायालयाच्या निर्देशाचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईतील २६ मशिदींनी भोंग्यावरुन अजान लावणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. भोंगे लावण्यासाठी आता स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असणार आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.