सोशल मीडियावर 'न्यूड फोटोंशी छेडछाड', रणवीर सिंहचा पोलिसांसमोर दावा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणामुळे सतत चर्चेत असतो.
Ranveer Singh
Ranveer SinghSaam Tv

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणामुळे सतत चर्चेत असतो. आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. रणवीरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या सात फोटोंपैकी एक फोटो त्याच्या पोस्टचा भाग नव्हता, त्या फोटोत छेडछाड करण्यात आली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात रणवीरने हा दावा केला आहे .

Ranveer Singh
Vedanta Foxconn Project : वेदांता फॉक्सकॉनवर आता खूद्द मालकांनीच दिले स्पष्टीकरण

"सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या फोटोंपैकी एक फोटो, न्यूयॉर्कच्या पेपर मासिकासाठी एक फोटो वापरला आहे. यामध्ये त्याचे प्रायव्हेट पार्ट कथितपणे मॉर्फ केले आहेत, हा फोटो त्यांच्या मालकीचा नाही.'' असा दावा रणवीरने २९ ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या जबाबात केला आहे.

रणवीर सिंहने ज्या फोटोचे वर्णन मॉर्फ केलेले आहे त्याच फोटोद्वारे मुंबई पोलिसांनी २६ जुलै रोजी रणवीर सिंहविरुद्ध अश्लीलतेच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

Ranveer Singh
Mahableshwar : महाबळेश्वरला जाणारी वाहतुक धिम्या गतीनं; अवजड वाहनांना घाटात प्रवेश बंदी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरच्या वक्तव्यानंतर पोलिसांनी आता हे फोटो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवले आहेत. जिथे फोटोत छेडछाड झाली आहे की नाही कळणार आहे. जर फोटोमध्ये छेडछाड झाल्याचे निष्पन्न झाले, तर रणवीर सिंहला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com