Mumbai Crime News: मुंबई पोलिसांचा सिनेस्टाईल 'सापळा'! देहविक्री व्यवसायात अडकलेल्या अल्पवयीन मुलीची केली सुटका

Mumbai Police Cinestyle Trap : वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलीला रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
Mumbai Police
Mumbai Policesaam tv

>> संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Police rescued minor girl from prostitution business: देह विक्रीच्या दुष्ट चक्रातून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात मुंबई एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. सिनेस्टाइल सापळा रचून पोलिसांनी या मुलीची सुटका केली आहे.

अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी ३० मे रोजी एका निवासी इमारतीवर छापा टाकून त्या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये ३५ वर्षीय महिला चालवत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी महिला आणि एका ग्राहकाला अटक केली असून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली.

Mumbai Police
Raj Thackeray's Letter to PM Modi: कुस्तीपटूंची तशी फरफट पुन्हा होऊ देऊ नका... राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना रोखठोक पत्र

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सेक्स रॅकेट एमआयडीसी कनकिया परिसरात असलेल्या एसआरए इमारतीच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये सुरू होते. माहिती मिळताच एनजीच्या मदतीने डीसीपी दत्ता नलावडे व वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रोहित जाधव, शोभा खरात आणि पीएसआय सुनील गायकवाड यांनी पोलीस पथकासह बोगस ग्राहक पाठवून घरावर छापा टाकून एक 17 वर्षाच्या मुलीची सुटका केली. (Mumbai Crime News)

चौकशी दरम्यान आरोपी महिला या फ्लॅटमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून भाड्याने राहत होती आणि गेल्या सहा महिन्यांपासून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. ती एका दिवसात फक्त एका महिलेला घेऊन जात असे आणि दिवसभर तिला घरात ठेवत असे. याची आजूबाजूच्या लोकांनाही कल्पना नव्हती असे पोलिसांनी सांगितले. (Crime News)

Mumbai Police
Mumbai News: जे.जे. रुग्णालयातील नेत्रतज्ञ्ज डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे; नेमकं काय घडलं?

वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलीला रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. महिला आणि ग्राहकावर पॉक्सो कायद्यासह आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com