Mumbai crime branch Anti Narcotics Cell
Mumbai crime branch Anti Narcotics Cellsaam tv

मुंबईतील १४०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचं अंबरनाथ कनेक्शन ? अंमली पदार्थविरोधी पथकाने टाकली धाड

मुंबईतील १४०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : शहरापासून जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात ड्रग्ज तस्करीविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई काल गुरुवारी करण्यात आली . मुंबई पोलिसांच्या (police) गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने (Anti Narcotics Cell) नालासोपाऱ्यात धडक कारवाई केली. या कारवाईत ७०३ किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात (mephedrone) आले. याची किंमत बाजारात १४०३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केलीय. परंतु, आज पुन्हा एकदा अंमली पदार्थविरोधी विभागाने धडक कारवाई करत अंबरनाथ एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीवर धाड टाकली.

Mumbai crime branch Anti Narcotics Cell
Wadia Hospital Fire : मुंबईच्या वाडिया रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला आग; ९ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल

आनंदनगर एमआयडीसीतील एका कंपनीत ही धाड टाकण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईतून अटक करण्यात आलेल्या आरोपीलाही या कंपनीत आणण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईच्या ड्रग्ज प्रकरणाचं कनेक्शन (Ambarnath) अंबरनाथमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थविरोधी विभागाच्या १८ ते २० अधिकाऱ्यांनी अंबरनाथमध्ये केलेल्या कारवाई दरम्यान काही नमुने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं या कंपनीत एमडी ड्रग्ज तयार केलं जात होतं का? किंवा एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी या कंपनीतून कच्चा माल पुरवला जात होता का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पालघर (Palghar) जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी छापे मारले.

Mumbai crime branch Anti Narcotics Cell
ISRO SSLV Launch: ७ ऑगस्टला अंतराळात तिरंगा फडकणार; ७५० विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह इसरो पूर्ण करणार स्वप्न

तब्बल ७०३ किलो एमडी (Drugs) जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत बाजारात १४०३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. एएनसीने या प्रकरणात ५ आरोपींना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. हे सर्व आरोपी मानखुर्द,घाटकोपर,गोवंडी,नालासोपारा येथील आहेत.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com