NCBच्या अधिकाऱ्यांची मुंबई पोलीस चौकशी करणार- दिलीप वळसे पाटील

समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणामध्ये केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
NCBच्या अधिकाऱ्यांची मुंबई पोलीस चौकशी करणार- दिलीप वळसे पाटील
NCBच्या अधिकाऱ्यांची मुंबई पोलीस चौकशी करणार- दिलीप वळसे पाटीलSaam Tv

मुंबई : समीर वानखेडे Sameer Wankhede यांनी आर्यन खान Aryan Khan प्रकरणामध्ये केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी केलेल्या आरोपांनंतर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस होती का? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आर्यन खान प्रकरणामध्ये पकडलेल्या दोघांविरोधामध्ये एनसीबीला NCB समाधानकारक पुरावे मिळाले नसल्याचे न्यायालयाने court सांगितले आहे.

यानंतर या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोर्टाच्या आदेशाचा उल्लेख करत या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज बोलून दाखवली आहे. कोर्टाने आरोपींना क्लिन चीट दिली आहे, तर ही कारवाई का करण्यात आली, याची चौकशी आता केली पाहिजे असे, वळसे पाटील यावेळी म्हणाले आहेत.

हे देखील पहा-

केंद्रीय एजन्सीचा गैरवापर केला जात असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले आहे. यानंतर राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय यंत्रणा यांच्यामध्ये मोठा वाद परत निर्माण होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर, त्यांनाच चौकशीच्या फेऱ्यात ओढण्याची तयारी राज्य सरकार करत आहे का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत.

NCBच्या अधिकाऱ्यांची मुंबई पोलीस चौकशी करणार- दिलीप वळसे पाटील
Angarki Sankashti: प्रथमच अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे मंदिर खुले; दर्शनसाठी भाविकांची गर्दी

त्यामध्ये राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. हायकोर्टाने या संपूर्ण प्रकरणाचा एनसीबीच्या तपासावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आर्यन खान प्रकरण म्हणजे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचे कट कारस्थान असल्याचे एनसीबीचे सांगणे आहे. मात्र, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये असे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे कोर्टाने सांगितले आहे.

तसेच नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केलेले आरोप हे विचारात घेण्याजोगे असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. यामुळे वानखेडेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या आर्यन खान प्रकरणाचा तपास समीन वानखेडे यांच्याकडून काढून एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com