मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अडीच कोटींचे ड्रग्स ताब्यात!

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मे महिन्यात मुंबई आणि परिसरातून अडीच कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे.
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अडीच कोटींचे ड्रग्स ताब्यात!
Medicines Saam Tv

सुरज सावंत

मुंबई: मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मे महिन्यात मुंबई आणि परिसरातून अडीच कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. मुंबई पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी कक्षाने केलेल्या कारवाईत एकुण ६२ गुन्हे दाखल करण्यात आले असुन ७३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Medicines
बसच्या धडकेत दुचाकीस्वार पोलिसाचा मृत्यु! भंडारा शहरातील घटना...

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ८५ किलोचा २० लाख रुपये किमतीचा गांजा तसेच ३९ लाख रूपये किमतीची ३२० ग्रॅम हिरोईन आणि ९०९ ग्रॅम चरस ज्याची किंमत २५ लाख रुपये एवढी आहे. या व्यतिरिक्त पोलिसांच्या कारवाईत १ कोटी ३१ लाख किमतीचा ८७६ ग्रॅम एमडी तर ७ लाख रुपये किमतीचा २३ ग्रॅम कोकेन पकडले गेले आहे.

हे देखील पाहा-

या व्यतिरिक्त ३६ लाख किमतीचे इतर अमली पदार्थ पोलिसांनी कारवाईत ताब्यात घेतले आहे. एकंदरीत मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मे महिन्यात मुंबईत अडीच कोटींचे ड्रग्स पकडण्यात यश आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com