प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचे 'Operation All Out'; शेकडो गुन्हेगारांना अटक

5 प्रादेषिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, 13 परिमंडळीय पोलीस उपआयुक्त, 41 विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात'Operation All Out' कारवाई केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचे 'Operation All Out'; शेकडो गुन्हेगारांना अटक
प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचे 'Operation All Out'; शेकडो गुन्हेगारांना अटकSaam TV

मुंबई : शहरातील सर्व पाच प्रादेषिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, 13 परिमंडळीय पोलीस उपआयुक्त, 41 विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात 'ऑपरेशन ऑल आऊट' कार्यवाई केली आहे.

'Operation All Out' मध्ये मुंबई पोलीसांच्या रेकॉर्डवरील 28 फरार आरोपीताना अटक करण्यात आली आहे. तर अजामीनपात्र वॉरंटमधील 110 आरोपीतांना अटक करण्यात आलेय.तसंच अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणा-या 132 इसमांवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा अन्वये अटकेची कारवाई करण्यात आली असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकुण 34 जणांवर कारवाई केली आहे त्यामध्ये चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. तर अवैध दारू विक्री /जुगार इ.अवैध धंदयांवर 28 ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त केले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचे 'Operation All Out'; शेकडो गुन्हेगारांना अटक
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरती आकर्षक 'तिरंगी' सजावट

दरम्यान, मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, परंतु मुंबई शहरात विनापरवाना प्रवेश केलेल्या एकुण 42 तडीपार आरोपींना अटक केली. महाराष्ट्र (मुंबई ) पोलीस कायदयाचे कलम 120, 122 व 135 अन्वये संशयितरित्या वावरणारे एकुण 128 इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 164 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. शहरात एकुण 234 ठिकाणी कोंबिंग ऑपरेषन राबविण्यात आले , त्यामध्ये अभिलेखावरील 1129 आरोपी (रेकॉर्डवरील) तपासण्यात आले. त्यामध्ये 270 आरोपी मिळून आले. त्यांचेवर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

तसंच, सर्व पोलीस ठाण्यांच्या हददीत एकुण 124 ठिकाणी नाकाबंदी (Blockade) लावण्यात आली होती. त्यामध्ये एकुण 6752 दुचाकी/चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. तर मोटार वाहन कायद्यान्वये 1214 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कलम 185 मो.वा.का. अन्वये 01 वाहनचालकांवर दारू पिऊन गाडी चालवल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. आणि बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुशंगाने एकुण 942 हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com