
Mumbai-Pune Expressway: मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून येथे वाहतूक कोंडी झाली आहे. (Latest Traffic News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खोपोली डायव्हर्जनमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळपासून येथे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे नागरिक देखील त्रस्त झालेत. अनेक चाकरमानी मुंबई-पुणे (Mumbai -Pune) असा प्रवास करतात. अशात कामाच्या वेळेत सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या येत असल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मर्गिकेवर सुमारे एक किमीपर्यंत वाहनांची रांग लागली आहे. नागरिकांच्या सोईसाठी, कमीवेळात जास्त अंतर कापता यावे यासाठी एक्स्प्रेसवे बांधण्यात आलेत. मात्र सातत्याने या एक्स्प्रेसवेवर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
'समृद्धी'चं प्रतीक असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ठरतोय मृत्यूचा सापळा
मुंबई-पुणे महामार्ग हा एकेकाळी प्रगतीचं आणि विकासाचं एक प्रतीक म्हणून ओळखला जात होता. या महामार्गाने वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचवता येत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे अपघाताच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Express Way) आजवर शेकडो व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावर अनेक व्यक्ती वाहनांची वेग मर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. साल २०२२ पासून आतापर्यंत ५४ हून अधिक अपघात झाले आहेत. महामार्गावरील फक्त ४ मुख्य ठिकाणी झालेल्या अपघाताची ही आकडेवारी आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.