Mumbai-Pune Expressway Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट, मुंबईकडील वाहतूक सुरू, पण...

Mumbai-Pune Expressway News : वाहतूक सुरळीत करण्यासाठी दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
Mumbai-Pune Expressway Update
Mumbai-Pune Expressway Update saam tV

Pune News : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील वाहतूक तब्बल साडेतीन तासांनंतर सुरु झाली आहे. महामार्गावर दरड कोसळल्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

यादरम्यान मुंबई-पुणे  एक्सप्रेस वे बंद ठेवण्यात आला होता. तब्बल साडेतीन तासांनंतर एक्सप्रेस हायवेवरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र साडेतीन तास एक्सप्रेस हायवे बंद असल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Mumbai-Pune Expressway Update
Politics over MLA fund Allocation : आमदार निधीवाटपाच्या मुद्द्याचे विधीमंडळात पडसाद, विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

रविवारी रात्रीच्या सुमारास महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहाटे अडीचपर्यंत दरड हटवण्यात आली होती. त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या होत्या.

Mumbai-Pune Expressway Update
Maharashtra Landslide News: दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणार राज्य सरकार, प्रस्ताव सादर करण्याचे अधिकाऱ्यांना देण्यात आले आदेश

मात्र एका लेनवरील दरड हटवण्यासाठी प्रशासनाने दुपारी १२ ते २ या वेळी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान पुण्याहून मुंबईकडे येताना चिवळे पॉइंट येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वाहतूक वळवण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com