Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो, छत्र्या घेऊनच घराबाहेर पडा; पुढील ३-४ तासांत पावसाचा जोर वाढणार; IMD कडून अलर्ट

Mumbai Rain Latest News: मुंबई महापालिकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबईतील उपनगरात ९६.६९ मिमी, तर पूर्व उपनगरात ८९.०८ मिमी पाऊस झाला.
Mumbai Rain Update IMD Issues yellow alert mumbai thane and maharashtra many district ssd92
Mumbai Rain Update IMD Issues yellow alert mumbai thane and maharashtra many district ssd92Saam TV

Mumbai Rain Latest News: गेल्या महिनाभराच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पहाटेपासून पावसानं मुंबईसह उपनगराला चांगलंच झोडपून काढलंय. गुरुवारपासून मुंबईत अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, शुक्रवारी पावसाने अधिकच जोर धरल्याचं दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Mumbai Rain Update IMD Issues yellow alert mumbai thane and maharashtra many district ssd92
Weather Alert: महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत धुव्वांधार पाऊस होणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून अलर्ट

मुसळधार पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची पुरती तारांबळ उडालीये. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत मुंबईत पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याने मुंबईला यलो अलर्टही जारी केला आहे.

मुंबई महापालिकेने (Mumbai BMC) सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबईतील उपनगरात ९६.६९ मिमी, तर पूर्व उपनगरात ८९.०८ मिमी पाऊस झाला. त्याचबरोबर आयलँड सिटी विभागात ६५.३६ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

दिलासादायक बाब म्हणजे, लोकल सेवेवर मात्र या पावसाचा कुठलाही परिणाम झाला नाही. मुंबईच्या तिन्ही लोकलसेवा निर्धारित वेळेत सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्याला दिलेला अलर्ट शनिवारपर्यंत वाढवला आहे. पुढील २४ तासांत या भागात पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सध्या मुंबई शहर (Mumbai Rain) आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई उपनगरच्या कांदिवली, बोरिवली मालाड अनेक भागात पावसाचं पाणी साचलं आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी तलावांध्ये ९०. ३७ टक्के इतका पाणीसाठा होता. शनिवारी सकाळी तो ९३.१७ टक्क्यांवर पोहचला आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com