Mumbai Rain : मुंबईत पुढच्या ४८ तासात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात शहरातील तापमान २५ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
Mumbai Update
Mumbai UpdateSaam Tv

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) पुन्हा सुरूवात केली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. येत्या ४८ तासात मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस(Rain) पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात शहरातील तापमान २५ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

Mumbai Update
Ajit Pawar: काही तरी गाजर दाखविल्‍यानेच प्रकल्‍प बाहेर गेला; अजित पवार यांचा आरोप

IMD ने आजपासून मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंजर अलर्ट जारी केला होता. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे, असेही सांगण्यात आले होते.

पावसामुळे (Rain) बुधवार १४ सप्टेंबर रोजी शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळे सध्याचे खराब रस्ते आणि खड्डे यामुळे अनेक भागात अडथळे, वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हाजी अली मार्ग आणि तारदेव मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती, कारण वाहतूक पोलिसांनी केम्प्स कॉर्नर पूल तांत्रिक समस्यांमुळे सुमारे 40 मिनिटे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com