नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं; कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

पोलिसांनी दिलेल्या नोटीसीनंतर राणा दाम्पत्याने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असं न्यायालयाने म्हटले आहे.
नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं; कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
Navneet RanaSaam Tv

मुंबई : हनुमान चालीसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याप्रकरणी राणा दाम्पत्य अटकेत होते. बारा दिवसानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आता मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारलं आहे. राजद्रोहाचा गुन्हा लावणे चुकीचं असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Navneet Rana
रवी राणा बाहेर येताच म्हणाले...; पतीला पाहताच नवनीत राणांना अश्रू अनावर

राणा (Navneet Rana) दाम्पत्यावर राजद्रोह लावणं चुकीचं आहे. त्यांच्यावरील राजद्रोह सिद्ध होत नसल्याची मुंबई सत्र न्यायालयाने माहिती दिली आहे. राणा दाम्पत्य मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठणं करणार नसल्याचे म्हटले होते. त्यांना पोलिसांनी (Police) दिलेल्या नोटीसीनंतर राणा दाम्पत्याने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असं न्यायालयाने म्हटले आहे. राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्य न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

राणा दाम्पत्याला कोणत्या अटींवर मिळाला जामीन

  • राणा दाम्पत्य या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बाब माध्यमांसमोर येऊन सांगू शकत नाही.

  • पुराव्यांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू शकत नाहीत.

  • ज्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती, त्या प्रकारचा कोणताही गुन्हा ते पुन्हा करू शकत नाहीत.

  • राणा दाम्पत्याला चौकशीत सहकार्य करावे लागेल.

  • तपास अधिकारी (IO) चौकशीसाठी बोलावतील, तेव्हा हजर व्हावे लागेल. त्यासाठी संबंधित तपास अधिकारी २४ तास आधीच नोटीस देतील.

  • ६. जामिनासाठी प्रत्येकी ५० हजारांचा बॉण्ड भरावा लागेल.

    हे देखील पाहा

रुग्णालयात दाखल नवनीत राणांचा जेल प्रशासनावर खळबळजनक आरोप

'खासदार नवनीत राणा यांची तब्बेत अधिक खालावली आहे, डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. त्यांनी लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीकडे जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतरही उपचार मिळालेले नाहीत. तुरुंग प्रशासनाने त्यांच्यावर दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवनीत यांची तब्बेत अधिक बिघडली आहे. याविरोधात कोर्टात जाणार' असल्याचे नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या वकीलांनी म्हटले आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.