२० वेळा ओवेसी कबरीपुढे झुकला तेव्हा कळलं नाही का?; संजय राऊतांचा भाजपला सवाल

कोणामुळे हिंदुत्व धोक्यात आले आहे ते तुम्ही ठरवा, असंही राऊत म्हणाले.
२० वेळा ओवेसी कबरीपुढे झुकला तेव्हा कळलं नाही का?; संजय राऊतांचा भाजपला सवाल
Sanjay Raut Saam Tv

मुंबई : आज मुंबईत शिवसेनेची मास्टर सभा सुरु आहे. या सभेत खासदार संजय राऊत यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. औरंदाबादमध्ये एमआयएमच्या सभेअगोदर ओवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिली. यावर आऱोप प्रत्यारोप सुरु झाले. यावरुन संजय राऊत यांनी आज भाजपवर टीका केली. 'दोन दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये एमआयएमआयचे ओवैसी येवून औरंगजेबच्या कबरीपुढे झुकला, तेव्हा लगेच भाजपचे नेते राज्यभरात उभ राहून शिवसेनेवर टीका करु लागले. पण त्यांच्या सरकारच्या काळात ओवैसी २० वेळा झुकला होता तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले, आपल्या तोफा नेहमी धडाडत असतात. आपले मुख्यमंत्री फार मोठा दारुगोळा घेवून मंचावर येणार आहे. आजची शिवसेनेची सभा शंभर सभांची बाप असेल. आजची सभा सांगते की मुंबईची बाप शिवसेना आहे. आमचा बाप हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत.

शिवसेनेचे हिंदुत्व छत्रपती संभाजी महाराजांसारखे आहे. ओवेसींचा धिक्कार करतो. २०१४ पासून ओवेसी महाराष्ट्रात येत आहे, तेव्हा तुम्ही का नाही रोखले. अनेक वेळा ओवेसी औरंगजेबासमोर नतमस्तक झाले आहेत, तेव्हा तुम्ही झोपले होते का?, असा सवालही राऊत यांनी केला.

काश्मीरमधला हिंदू सगळ्यात जास्त खतरेमे आहे. राहुल भट्ट यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा निषेश करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या काश्मिरी पंडीतांवर अश्रुच्या नळकांड्या टाकण्यात आल्या. कोणामुळे हिंदुत्व धोक्यात आले आहे ते तुम्ही ठरवा, असंही राऊत म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com