Talathi Exam 2023 : तलाठी भरती प्रक्रियेतील गोंधळाची मालिका सुरुच, मुंबईत उमेदवारांना परीक्षा न देताच परतावं लागणार?

Mumbai News : परीक्षा केंद्रावर या विद्यार्थ्यांची संवाद साधण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे.
Mumbai News
Mumbai News Saam TV

गिरीश कांबळे

Mumabi News : तलाठी भरती परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ सुरुच आहे. नाशिकमध्ये पेपरफुटीनंतर झालेल्या विदर्भातील परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता. मुंबईत देखील ही परिस्थिती कायम आहे.

मुंबईत तलाठी भरतीच्या परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळत आहे. मुंबईतील पवई आयटी पार्क सेंटरवर आज विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले असता, वेळेपूर्वीच गेट बंद केल्यामुळे प्रवेश न मिळाल्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गेटवर उभं राहावं लागलं आहे.

Mumbai News
Talathi Exam 2023: तलाठी परीक्षेत यंत्रणा फेल! अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन; हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा

परीक्षा केंद्रावर या विद्यार्थ्यांची संवाद साधण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातून मुंबईत परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आल्या पावली परतावं लागणार आहे.  (Latest Marathi News)

तांत्रिक बिघाडामुळे उमेदवारांचा खोळंबा

२१ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात सर्व्हर डाऊन झाल्याची प्रकार समोर आला होता. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला होत. इंटरनेट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेर ताटकळत थांबावे लागले होते. याबाबत प्रशासनाकडून सॉफ्टवेअर अपडेट होत असल्याचे सांगण्यात आले होते.

Mumbai News
Talathi Bharati 2023: तलाठी भरतीने सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! ४६४४ पदांसाठी तब्बल साडे बारा लाख अर्ज; 'इतक्या' कोटींची रक्कम जमा

त्याआधी नाशिकमध्ये तलाठी भरती प्रक्रियेत हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला होता. वॉकीटॉकीच्या साहाय्याने कॉपी केल्याचे प्रकरण समोर आले होते. ज्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com