Mumbai TB Hospital : मुंबईतील शिवडी टीबी हॉस्पिटलचा बालरोग विभाग सुरू, आशियातील सर्वात मोठं रुग्णालय

Mumbai News : बालरोगतज्ज्ञांच्या रिक्त जागी डॉक्टरांच्या नियुक्तीनंतर मुंबई महापालिकेने हे वॉर्ड सुरु केले आहेत.
Mumbai TB Hospital
Mumbai TB HospitalSaam TV

Mumbai News :

आशियातील सर्वात मोठ्या क्षयरोग म्हणजेच टीबी रुग्णालयातील बालरोग वॉर्ड चार वर्षांनंतर सुरु करण्यात आला आहे. बालरोगतज्ज्ञांच्या रिक्त जागी डॉक्टरांच्या नियुक्तीनंतर मुंबई महापालिकेने हे वॉर्ड सुरु केले आहेत. २४ ऑगस्ट रोजी ही रिक्त जागा भरण्यात आली आहे.

द इंडियने एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बालरोग तज्ज्ञ नसल्याने शिवडी रुग्णालयातील बालरोग वॉर्ड अनेक महिन्यांपासून बंद होता. सध्या रुग्णालयात दोन बाल क्षयरोगाचे रुग्ण आहेत, अशी माहिती बीएमसीच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.  (Latest Marathi News)

Mumbai TB Hospital
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग, मंत्रिमंडळ बैठकीत कुणबी प्रमाणपत्र रिपोर्टबाबत मोठा निर्णय

2021 मध्ये क्षयरोग पीडित एकूण 5446 बालके आढळली होती. मागील पाच वर्षातील ही सर्वाधिक आकडेवारी होती. यातील काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र 2018मध्ये बालरुग्णांना शिवडी रुग्णालयात दाखल करणे बंद केले होते. (Mumbai News)

मुंबईतील काही रुग्णांना वाडिया हॉस्पिटलसोबत झालेल्या करारानुसार दाखल केले जात होते. तर काही बालरुग्णांवर जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात होते. काही क्षयरोगग्रत मुलांना दीर्घकाळासाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असते.

Mumbai TB Hospital
Political News : एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली जातेय? असीम सरोदेंनी उपस्थित केला सवाल

आरोग्य क्षेत्रात काम करणारे गणेश आचार्य यांनी सांगितलं की, कोरोना काळात लहान मुले घरामध्ये असल्याने टीबी संसर्गाच्या संख्येत मोठी वाढ झाली. क्षयरोग संसर्गजन्य असल्याने या रुग्णांना इतर रुग्णांपासून वेगळे ठेवावे लागते. मात्र बेड उपलब्ध नसल्याने नाईलाजाने कुटुंबियांना महागड्या रुग्णालयांकडे वळावे लागत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिका शिवडी रुग्णालयातील बालरोग वॉर्डच्या खाटा वाढवण्याचाही विचार करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com