Mumbai : दिवा डम्पिंगचे होणार स्थलांतर, 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने केला विरोध

ठाणे महापालिकेने दिवा डम्पिंगसाठी कल्याण ग्रामीण क्षेत्रातील 14 गावा मधील भंडार्ली गावात जागा भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. ठाणे पालिकेच्या या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांनी व 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने जोरदार विरोध केला आहे.
Mumbai : दिवा डम्पिंगचे होणार स्थलांतर, 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने केला विरोध
Mumbai : दिवा डम्पिंगचे होणार स्थलांतर,14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने केला विरोधप्रदीप भणगे

दिवा :  ठाणे महापालिकेने दिवा डम्पिंगसाठी कल्याण ग्रामीण क्षेत्रातील 14 गावा मधील भंडार्ली गावात जागा भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. ठाणे पालिकेच्या या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांनी व 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने जोरदार विरोध केला आहे.  14 गावातील ग्रामस्थ यांची बैठक आज मातोश्री सभागृह नारिवली येथे पार पडली. यामध्ये चौदा गावे महापालिका मध्ये समाविष्ट होणे बाबत, नळ पाणी पुरवठा योजने बाबत, टोरोंटो वीजचा अनागोंदी कारभार आणि ठाणे महापालिकेमार्फत चौदा गावांमध्ये होऊ घातलेले डंपिंग या विषयांवर चर्चा केली.

हे देखील पहा :

यावेळी जर भंडार्ली गावात दिवा डम्पिंग आणले तर उग्र आंदोलन करू असे 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने आणि भंडार्ली गावात ग्रामस्थ यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले. आधीच 14 गावांत प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात असताना ठाण्यातील घाण आमच्या गावात कशाला? आमचा या डम्पिंगला विरोध असून जर दखल घेतली गेली नाही तर समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, मोतीराम गोंधळी, सुखदेव पाटील, गुरुनाथ पाटील, ज्ञानेश्वर येंदारकर, चेतन पाटील यांसह अनेक मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उल्हासनगर महापालिकेचे उसाटने गावात डम्पिंग होणार आहे.त्यात आता भंडार्ली गावात ठाणे महापालिकेचे डम्पिंग येत असल्याने भूमीपुत्रांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डम्पिंग विषय चांगलंच गाजु शकतो यात काही वाद नाही.

Mumbai : दिवा डम्पिंगचे होणार स्थलांतर,14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने केला विरोध
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Mumbai : दिवा डम्पिंगचे होणार स्थलांतर,14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने केला विरोध
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!

ठाणे महापालिकेची घाण आमच्या 14 गावात आणण्याचा घाट घातला जात आहे. आमच्या सारखे दुर्दैवी दुसरे कोणी नाही. गावांत पिण्यायोग्य पाणी नाही. आरोग्य केंद्र नाही. हवा, जमिन, पाणी दूषित झाले आहे. त्यात आता डम्पिंग आणले जात आहे. इथे माणसं राहतात, की जनावरे?  ठाणे महापालिकेने त्यांच्या हद्दीतच डम्पिंगला जागा शोधावी, महापालिकेकडे भूखंड आहेत. इथे डम्पिंग आणण्याचा प्रयत्न केला तर सर्व ग्रामस्थ मोठे आंदोलन करतील असा इशारा समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी दिला आहे. तर, भंडार्ली गाव हे अगोदरच प्रदूषणाचे माहेर घर होऊन बसले आहे. त्यात आता ठाण्याचे डम्पिंग येथे आणल्यास आमचे जगणे कठीण होईल. या परिस्थितिचा विचार करून प्रशासनाने ग्रामपंचायत हद्दीत कोठेही डम्पिंग लादु नये. असे मत माजी सरपंच कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com