ठाण्यात पुन्हा एक मोठी दुर्घटना; दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू

या घटनेमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
ठाण्यात पुन्हा एक मोठी दुर्घटना; दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू
ठाण्यात पुन्हा एक मोठी दुर्घटना; दरड कोसळून ५ जणांचा मृत्यूSaam Tv

ठाणे - मुंबईसह Mumbai ठाणे Thane जिल्ह्यात पावसाने Rain जोरदार हजारे लावली. गेल्या ४८ तासात या मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेकांचा बळी देखील घेतला आहे. चेंबूरमध्ये Chembur घरांवर दरड कोसळल्याची घटना एकीकडे ताजी असताना ठाण्याच्या कळवा शहरात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

हे देखील पहा -

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घरावर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकल्यानंतर नागरिक घराबाहेर आले. या घटनेमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरड कोसळल्याने नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

ठाण्यात पुन्हा एक मोठी दुर्घटना; दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू
उघड दार देवा आता! गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची मागणी

परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, या दुर्घटनेत तब्बल ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com