Mumbai University: मुंबई विद्यापीठाअंतर्गत 178 महाविद्यालयं प्राचार्यविनाच

महाविद्यालयाच्या यादीत प्रभारीच्या हवाली महाविद्यालये असल्याची माहिती उघडकीस आली आहे
Mumbai University: मुंबई विद्यापीठाअंतर्गत 178 महाविद्यालयं प्राचार्यविनाच
Mumbai UniversitySaam Tv

मुंबई : एकीकडे कुलगुरु निवडीत राज्य सरकारच्या मंत्र्यांची एन्ट्री होत असताना दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 178 महाविद्यालय प्राचार्यविना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाविद्यालयाच्या यादीत प्रभारीच्या हवाली महाविद्यालये असल्याची माहिती उघडकीस आली आहे (Mumbai University 178 colleges are running without principals).

Mumbai University
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! 16 कोटींचे ड्रग्ज जप्त, 3 तस्करांना अटक

मुंबई (Mumbai) विद्यापीठाच्या महाविद्यालयीन शिक्षक मान्यता कक्षाने 38 पानाची यादी दिली. या यादीत एकूण 808 महाविद्यालयाची नोंद असून यापैकी 81 महाविद्यालयात प्राचार्याऐवजी संचालक हे पद अस्तित्वात आहे. 727 पैकी 178 महाविद्यालय प्राचार्याविना आहेत. तर 23 महाविद्यालयांची माहिती विद्यापीठाच्या अभिलेखावर उपलब्ध नाही.

ज्या महाविद्यालयात प्राचार्य सारखे महत्वाचे पद रिक्त आहे किंवा प्रभारीच्या हवाली कारभार आहे. त्यात केजे सोमय्या, ठाकूर एज्युकेशनल ट्रस्ट, शहीद कलानी मेमोरियल ट्रस्ट, तलरेजा महाविद्यालय, वर्तक महाविद्यालय, बॉम्बे फ्लाईंग क्लब महाविद्यालय, रामजी असार महाविद्यालय, गुरुनानक विद्यक भांडुप, शेठ एनकेटीटी महाविद्यालय, जितेंद्र चौहान महाविद्यालय, मंजरा महाविद्यालय, रिझवी महाविद्यालय, अकबर पिरभोय महाविद्यालय, संघवी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, विलेपार्ले केलवानी महाविद्यालय, बॉम्बे बंट्स महाविद्यालय, आरआर एज्युकेशन महाविद्यालय, एचआर महाविद्यालय, अंजुमन इस्लाम महाविद्यालय सारख्या महाविद्यालयाचा समावेश आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com