Mumbai: मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावरकरांचं नाव मंजूर! अनेक संघटनांचा विरोध कायम

Mumbai University Hostel Named As Savarkar : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार या वसतिगृहाला स्वातंत्र्यावीर सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai University Hostel Named As Savarkar
Mumbai University Hostel Named As SavarkarSaam TV

रश्मी पुराणिक

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या (Hostel) नामकरणाबाबत मोठा वाद निर्माण झालेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार या वसतिगृहाला स्वातंत्र्यावीर सावरकरांचं (Swatantryaveer Savarkar) नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अभाविपच्या मागणीला यश आल्याचं बोललं जातंय. या निर्णयाबाबत छात्रभारतीने या संघटनेने निर्णयाचा विरोध केला आहे. (Mumbai University Latest News)

हे देखील पाहा -

मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या नावावरुन वाद निर्माण झाला होता. नव्याने बांधण्यात आलेल्या या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच नाव देण्यात यावं अशी सूचना राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केली होती, तर या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली होती. आता अखेर याबाबतचा निर्णय आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावंत्र्यावीर सावरकरांचं नाव देण्यात आलं आहे. राज्यपालांनी दिलेल्या सुचनेनुसार हे नाव देण्यात आलं आहे.

आज झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याबाबत युवासेना सिनेट सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शाहू महाराज हे दोन्ही पूजनीय असल्याची प्रतिक्रिया युवासेना सिनेट सदस्यांनी दिली आहे. राज्यपालांनी केलेल्या सूचनेला प्राचार्य भांबरे, सिनेट सदस्य निल हेलेकर, प्राध्यापक गरजे यांनी यांनी पाठींबा दिला. १४६ विद्यार्थ्यांची क्षमता असलेलं हे वसतिगृह सहा मजल्यांचं आहे. पश्चिम मुंबईतील सांताक्रूझ येथील कलिना कॅम्पसमध्ये हे वसतिगृह बांधण्यात आलं आहे.

Chhatra Bharati Mumbai Press Release
Chhatra Bharati Mumbai Press ReleaseSaam TV

याबाबत छात्रभारती संघटनेने परिपत्रक काढत या निर्णयाचा निषेध केला आहे. या परिपत्रकात म्हटलं की, सावरकर यांचे शैक्षणिक योगदान काय? त्यावेळेसच्या पुरोहितांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले आताही वसतीगृहाला शाहूंचं नाव नाकारलं. आजही यांना शाहूंच्या नावाचं वावडं आहे, अशी संतप्त भावना व्यक्त करत छात्र भारतीने मुंबई विद्यापीठाचा निषेध केला आहे.

Mumbai University Hostel Named As Savarkar
Fakt Marathi Cine Sanman Awards 2022 : अमृता खानविलकर ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; पाहा पुरस्कार सोहळ्याचे खास Photos

8 जुलै 2022 ला कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी राज्यपाल आपल्या भाषणादरम्यान कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे पाहून म्हणाले, "वीर सावरकर यांनी १८५७ चा पहिला स्वातंत्र्यसंग्राम लिहिला. मला वाटतं कुलगुरू त्यांच्या नावाला विद्यापीठात कुठेतरी स्थान देतील." राज्यपालांच्या या भाषणावर अनेक संघटनांनी आक्षेप घेतला होता, तर या वादात राजकीय पक्षांनीही उडी घेतली होती. यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावरकरांचं नाव देण्यात आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com