कल्याण ग्रामीण मधील पाणी प्रश्न पेटला; गावातील रहिवासी उतरले रस्त्यावर

पाण्यासाठी भाजप- मनसे एकत्रित मोर्चा काढला.
Kalyan
Kalyan प्रदीप भणगे

डोंबिवली : कल्याण ग्रामीण मधील पाणी प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी भाजप- मनसे (MNS) एकत्रित मोर्चा काढला. तरीसुद्धा महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाने याकडे गामभिर्याने लक्ष दिलेले दिसत नाही. त्यातच काल पाणी नसल्याने कपडे धुण्यास खदानीवर गेलेल्या गायकवाड कुटुंबातील (family) ५ जणांचा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान आज देसलेपाडा मधील नागरीक आता आक्रमक झाले, असून पाण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी त्यांनी आपला राग व्यक्त करत सांगितले की एवढं होऊनही पाणी जर मिळणार नसेल तर आयुक्त कार्यालावर (Commissioner Office) मोर्चा काढू, दरम्यान पाणी टंचाईने ५ जणांचे बळी घेतले आहेत. आतातरी प्रशासनाला जाग येईल का? हे पाहावे लागणार आहे.

हे देखील पाहा-

दरम्यान काल सायंकाळच्या ६ वाजल्याच्या सुमारास देसले पाडा येथील गायकवाड कुटुंबातील २ महिला व ३ मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ५ जणांचे मृतदेह बाहेर काढले.मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हे मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले होते.

Kalyan
धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून सात जणांची हत्या

अपेक्षा गायकवाड (वय-३०), मीरा गायकवाड (वय-५५), मयुरेश गायकवाड (वय-१५), मोक्ष गायकवाड (वय-१३) निलेश गायकवाड (वय-१५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून या भागातील पाणीटंचाई किती गंभीर आहे, याची दाहकता प्रशासनच्या समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com