मुंबई : वाशीनाका परिसरात युवकावर गोळीबार; तलवारीनेही केले वार

वाशी नाका परिसरात युवकावर प्राणघातक हल्ला...
मुंबई : वाशीनाका परिसरात युवकावर गोळीबार; तलवारीनेही केले वार
मुंबई : वाशीनाका परिसरात युवकावर गोळीबार; तलवारीनेही केले वारजयश्री मोरे

जयश्री मोरे

चेंबूर: चेंबूरच्या वाशीनाका येथील न्यु आरएनए म्हाडा कॉलनी मध्ये एका युवकावर दोन अज्ञात व्यक्तींकडून फायरिंगची (Firing) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ही घटना एका प्रत्येक्षदर्शी महिलेने पाहिले आहे या हल्ल्यात या युवकावर तलवारीने ही मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

मात्र, युवकाने बचाव करण्याचा प्रयत्न केल्यामुळे जीवावर बेतले होते. ते थोडक्यात तलवारीचा घाव लागला आहे याबाबत आरसीएफ पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून अधिक तपास करणे सुरु आहे.

हे देखील पहा-

वाशीनाका येथे राहणारे रवींद्र गायकवाड उर्फ पिंट्या याच्यावर आज सायंकाळी हा हल्ला दोन अज्ञात व्यक्तींकडून झाला. या हल्ल्याबाबत जखमी पिंट्या यांनी सांगितले की, मी माझ्या आवारात होतो. बाईक वर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीं पैकी एकाने माझ्यावर बंदूक रोखली मात्र त्याच्या फायरिंग करताना मी ती चुकवली. ती समोरच्या भिंतीला लागली दुसरी गोळी झाडली ती ही चुकवली यात मी सुदैवाने वाचलो. त्यातच दुसऱ्याने तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो मी चुकवत असताना माझ्या खांद्याला तलवार घसरून गेली. मी मोठा दगड उचलून त्यांच्यावर भिरकावल्यावर ते बाईक वर पसार झाले.

मुंबई : वाशीनाका परिसरात युवकावर गोळीबार; तलवारीनेही केले वार
बॉलिवूडच्या 15 अभिनेत्रींना महागडे गिफ्ट्स पाठवणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण ?

घटनास्थळी असलेल्या एक महिलेने ही घटना आपल्या समोर घडल्याचे पोलिसांना सांगितले. आता या प्रकरणी उच्च पातळीवर पोलीस तपास सुरू झाला आहे. घटनास्थळी एडिसनल डिसिपी संजय दराडे, डिसिपी कृष्णकांत उपाध्याय ,वपोनी बाळासाहेब आवटे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com