Ganesh Visarjan 2023: मुंबईकरांनो! बाप्पाला कुठे देणार निरोप; BMCकडून गणपती मूर्ती विसर्जन स्थळांची यादी जाहीर

Ganesh Chaturthi BMC Guideline:मुंबईत गणेश चतुर्थीनिमित्त मूर्तींचे विसर्जन कुठे होणार याची यादी बीएमसीने जाहीर केलीय.
Mumbai Ganpati Visrajan Spots
Mumbai Ganpati Visrajan Spotssaam Tv

Mumbai Ganpati Visarjan Spots:

महाराष्ट्रात आज मोठ्या उत्साहात गणरायाचं स्वागत करण्यात आलं. मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाला घरी आणत गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गणेश चतुर्थीला गणरायचं आगमन होत असतं. गणेश भक्त पूर्ण १० दिवस गणरायाची पूजा करतात. मंडळातही गणपती बाप्पांच्या मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते. यंदा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गणेशोत्सवासाठी २ हजार ७२९ मंडळांना परवानगी दिलीय.

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जे मंडळ रस्त्यावर मंडप टाकून गणेशोत्सव साजरा करणार आहेत, अशा मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाईन करावेत, अशा सूचना बीएमसीनं आधीच दिल्या होत्या. मुंबई महापालिकेनं १ ऑगस्टपासून परवानगी अर्ज घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान गणेश चतुर्थीनिमित्त अनेक गणेश मंदिरात भाविकांनी गर्दी केली. गणेशोत्सव शांततापूर्ण पार पडावा, यासाठी बीएमसी आणि मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान मुंबईतील अनेकजण दोन, तीन, पाच आणि दहा दिवस गणेशोत्सव साजरा करत असतात.

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून बाप्पाचं विसर्जन केलं जातं. विसर्जनासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बीएमसीनं वार्डानुसार विसर्जन तळे तयार केली आहेत. मुंबई महापालिका विसर्जन सुव्यवस्थित व्हावे. वाहतूक कोंडी होऊ नये आणि प्रदूषणविरहीत विसर्जन केले जावे, यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे. बीएमसीनं एकूण २ हजार ७२९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी दिलीय. या उत्सवासाठी महापालिकेनं मोठी तयारी केलीय. यात मंडळाचा परिसर, मूर्ती विसर्जन मार्ग आणि महापालिकेडून प्रमुख ठिकाणांवर निरीक्षण करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान महापालिकेवर सुरक्षेची मोठी जबाबदारी असते. तसेच ज्या मंडळांमध्ये दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तेथे मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येते. सुरक्षेसाठी एकूण १३ हजार ७५० पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. यात ११ हजार ७२६ हवालदार आहेत. तर उपनिरीक्षक ते सहाय्यक आयुक्त दर्जाचे २ हजार २४ अधिकारी आणि १५ उपायुक्त अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलीत.

Mumbai Ganpati Visrajan Spots
Mahaganapati Temple: बदलापुरातील ३५० वर्षे जुन्या महागणपती मंदिरचं पेशव्यांशी काय आहे नातं; काय आहे इतिहास?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com