मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्जसुमित सावंत

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रविवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना ग्लोबल रुग्णालयात भरती केलं होतं.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर mayor of mumbai kishori pedanekar यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रविवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना ग्लोबल रुग्णालयात global hospital mumbai भरती केलं होतं. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्या परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहे. Mumbai's Mayor Kishori Pednekar discharged from hospital

ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानत असल्याचे महापौरांनी यावेळी प्रतिपादन केले. स्थानिक आमदार श्री. अजय चौधरी, माजी आमदार श्री.दगडू दादा सपकाळ, श्री. सुधीर साळवी यांचे विशेष सहकार्य लाभले असून याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले आहेत.

हे देखील पहा -

त्यासोबतच रुग्णालयाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर, वरिष्ठ ह्दयरोग तज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी, अस्थिरोग तज्ञ डॉ. श्रीधर आर्चिक, पोटविकार तज्ञ डॉ. अमित मायदेव, यकृत तज्ञ डॉ. आकाश शुक्ला, ग्लोबल रुग्णालयाचे परिचालन प्रमुख श्री.अनुप लॉरेंस, परिचारिका विभागाच्या प्रमुख जेसिका डिसूझा या सर्वांचे सुद्धा महापौरांनी आभार मानले आहेत.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com