
भूषण शिंदे -
मुंबईः वाहतूककोंडी व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवासवेळेत सध्या वाढ झाली आहे. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासनतास अडकून राहण्याचा अनुभव मुंबईकरांना नवा नाही. अशा स्थितीत प्रवासवेळेत बचत करण्यासाठी मुंबई रेल्वेवरील सगळ्यात मोठ्या रेल्वे उड्डाणपुलाचे अर्थात शिवडी रेल्वे पुलाचे काम महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) सुरू केले आहे. (Maharashtra Railway Infrastructure Development Corporation)
मुंबई (Mumbai) पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल) आणि वरळी-शिवडी मार्गावरील हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. रेल्वे रुळांपासून सर्वांत उंच (२२ मीटर) असलेला हा पूल ऑगस्ट २०२३मध्ये पूर्ण होईल, असा दावा महारेलने केला आहे.
पूल का महत्त्वाचा?
मुंबई पारबंदर प्रकल्पाचा मुक्तमार्गाकडे जाणारा जोडरस्ता या पुलाखालून जाणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होत आहे. यासाठी या जोडरस्त्याचे काम होण्यासाठी शिवडी रेल्वे उड्डाणपूल उभा राहणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई पारबंदर प्रकल्प आणि वरळी-शिवडी मार्गाला जोडण्याचे काम हा पूल करणार आहे. नवी मुंबई येथून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांचा यामुळे अर्धा तास वेळ वाचणार आहे.
अशी आहे तयारी -
पुलासाठी आवश्यक गर्डरची बांधणी आणि पूल उभारताना विविध बांधकामे आणि केबल हटवण्याचे काम महारेलकडून यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. पुलाचे खांब उभारण्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू आहे. तसंच स्टील गर्डरचा वापर करण्यात येणार असल्याने त्यासाठी आवश्यक गर्डर फॅब्रिकेशनचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून MMRDA कडून सर्व मंजुरी मिळाली असून मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग आणि मुख्यालयातून येत्या दोन आठवड्यात मंजुरीची अपेक्षा आहे.
असा असेल उड्डाणपूल -
ये-जा करण्यासाठी एकूण चार मार्गिका
लांबी - ८२ मीटर
रुंदी - १८.०५ मीटर
उंची - २२ मीटर
एकूण खर्च - ४५ कोटी
काम पूर्ण होण्याचा कालावधी - १५ महिने.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.