Mumbai News: पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून गावकऱ्यांनी कुटुंबावर टाकला बहिष्कार, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मोकल कुटुंबियांना गावातील कोणत्याही समारंभाला आणि सुखदुःखात उपस्थित राहू नये असा लेखी आदेश देण्यात आला.
Mumbai News
Mumbai NewsSaam TV

>> संजय गडदे

मुंबई : मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली गावात आठ महिन्यापूर्वी वाद झाला होता. या वादातून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून गावकऱ्यांना हाताशी धरून कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. (Mumbai News)

शिंपोली येथील गावदेवी ग्रामस्थ मंडळ या नोंदणीकृत सोसायटीतील पदाधिकारी आणि काही मंडळीनी मोकल कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला. यामुळे हे कुटुंब मागील अनेक दिवसांपासून प्रचंड दबावाखाली जगत असून या घटनेविरोधात अखेर या कुटुंबाने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या या तक्रारीवरून बहिष्काराचा निर्णय घेणाऱ्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

Mumbai News
Pakistani Boat: तटरक्षक दलाची अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटवर कारवाई, शस्त्रास्त्रांसह 300 कोटींचे ड्रग्स जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, शिंपोली भागात राहणाऱ्या मोकल आणि माळी कुटुंबात वाद झाला होता. यावरून स्वाती विकी मोकल यांनी 16 एप्रिल 2022 रोजी माळी कुटुंबाविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याचा राग मनात धरून माळी कुटुंबांनी गावकऱ्यांच्या मदतीने मोकल कुटुंबाविरोधात कटकारस्थान रचण्यास सुरुवात केली.

यानंतर गावदेवी ग्रामस्थ मंडळ शिंपोली या संस्थेचे पदाधिकारी पंढरीनाथ भंडारी, महेंद्र भंडारी, दामोदर म्हात्रे, मनमोहन भंडारी,सुनील पाटील, तसेच शांतीबाई किनी यांनी 22 एप्रिल या दिवशी गाव बैठक घेऊन मोकल कुटुंबातील सदस्य यांच्यावर माळी कुटुंबावरील तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तक्रार मागे घेतली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती.

Mumbai News
Pune : 'मनसेनं 2019ला तिकीट कापलं होतं, आता पक्षाने आदेश दिला तर...' कसबा पोटनिवडणुकीसाठी रुपाली पाटील सज्ज

मात्र तक्रार मागे न घेण्यावर ठाम राहिल्यामुळे अखेरीस 8 मे 2022 रोजी गावदेवी ग्रामस्थ मंडळ शिंपोली यांच्याकडून मोकल कुटुंबीयांना एक पत्र पाठवण्यात आले. या पत्रानुसार मोकल कुटुंबियांविरोधात बहुमताने प्रस्ताव पारित करून या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आल्याचं कळवलं शिवाय शिंपोली गावातील गावदेवी पालखी घरासमोर थांबणार नाही.

यापुढे गावातील कोणत्याही समारंभाला आणि सुखदुःखात उपस्थित राहू नये असा लेखी आदेश देण्यात आला. यामुळे फिर्यादी यांनी मनमोहन भंडारी, सुनील पाटील, शांताबाई केनी आणि ग्रामस्थांच्या या निर्णयाविरोधात दखलपात्र गुन्हा नोंद करण्यासाठी अर्ज देण्यात आला होता. अखेरीस हा निर्णय घेणाऱ्या एकूण सात जणांविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com