Mumbra Crime News: ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन, मोबाईल गेम झाला धर्मांतराचा सोपा मार्ग

ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन, मोबाईल गेम झाला धर्मांतराचा सोपा मार्ग
Mumbra Crime News
Mumbra Crime NewsSaam Tv

>> कल्पेश गराडे

Mumbra Crime News: सध्या देशभरात ऑनलाईन धर्मांतरचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या धर्मांतराच्या विषयाचे कनेक्शन आता मुंब्र्यात असल्याची बाब उघड झाली आहे. मुंब्र्यातील आरोपी शाहनवाज खान याने फेक युजर आयडी बनवून त्याच्या मदतीने एक गेम लॉन्च केला. या गेममध्ये हिंदू मुलांना कलमा वाचण्यासाठी तयार करून इस्लाम कबूल करण्यास भाग पडल्याचे समोर आले आहे.

हा आरोपी मुलांना इस्लाम कबूल केला तर तुम्ही कधी गेम हरणार नाही, असे अमिश दाखवत होता. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील गाजियाबाद पोलिसांनी या शाहनवाजचा शोध घेत मुंब्रा येथे पोहचले आहेत. मात्र आरोपी शाहनवाज हा आपल्या कुटुंबियांसोबत फरार झाला आहे. गाजियाबाद पोलिसांच्या पथकाची स्थानिक मुंब्रा पोलिसांसोबत शोध मोहीम सुरु केली आहे.

Mumbra Crime News
Shrikant Shinde : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत; मुंबईत आखली मोठी रणनीती, वातावरण तापण्याची शक्यता

हिंदू धर्मीय मुलांना ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याची नोटीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी बजावली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहनवाज खान हा आपल्या कुटुंबियांसोबत मुंब्रा येथील देवरी पाडा परिसरात रहाणार असल्याची माहिती गाजियाबाद पोलिसांना मिळाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आरोपीच्या शोधासाठी मुंब्र्यात दाखल झाले. या प्रकरणाच्या तपासात उत्तर प्रदेश पोलिसांनी गाजियाबाद येथून अब्दुल रहमान उर्फ नन्नी पुत्र महमूद अन्सारी या आरोपीला अटक केली. कुटुंबीयांची तक्रार गाझियाबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, महाराष्ट्रातील मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातूनतो तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता.

Mumbra Crime News
Sulochana Latkar Funeral: सुलोचना दीदी पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

या गेममध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम कबूल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे प्रलोभन दाखवत होता. शाहनवाजच्या शेजारच्यांनी सांगितले की, त्याच्या घरात तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे. शाहनवाजचा हर्बल शॅम्पू बनवण्याचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांच्या घराला कुलूप आहे.

या बाबत पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी गाजियाबाद येथून आलेले पथक हे आपल्या सोबत सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे सांगितले. गेल्या चार दिवसांपासून शाहनवाजचा शोध सुरु आहे. मात्र या प्रकरणी कॅमेरा समोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com