धक्कादायक: वसई विरार महापालिकेच्या ठेकेदारांकडूनचं पालिकेची फसवणूक!

बाजार वसुली करात फसवणूक
Vasai Virar Municipal Corporation
Vasai Virar Municipal Corporationचेतन इंगळे

चेतन इंगळे

वसई/विरार: वसई विरार महानगर पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या बाजार करात ठेकेदारांनीच पालिकेला फसविण्याचा प्रकार सुरु आहे. यात ठेकेदार बोगस पावत्या बनवून बाजार कराची अतिरिक्त वसुली करून पालिकेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत आहेत. तर महानगर पालिकेकडे कर वसुली संदर्भातला कोणताही विदा (डाटा) उपलब्ध नाही. यामुळे ठेकेदार आणि काही हेतुपुरसस्पर कर्मचारी महापालिकेच्या उत्पन्नावर डल्ला मारत आहेत.

वसई विरार महानगरपालिकेला (Vasai Virar Municipal Corporation) बाजार कर स्वरुपात कोट्यावधी रुपयाचे उत्पन्न मिळत असते. यासाठी पालिका दरवर्षी बाजार वसुलीचे ठेके देऊन ठेकेदाराच्या मार्फत ही वसुली करते. ठेकेदार फेरीवाले, रस्त्यावर विक्री करणारे, आठवडे बाजार, हातगाड्या, भाजीपाल्याच्या गाड्या, पालिकेकडून भरविलेले बाजार अशा स्वरुपात २० ते ४० रुपये फुट प्रमाणे वसुली करते. यात पालिकेने ठेकेदाराला काही अटीशर्ती दिल्या आहेत.

Vasai Virar Municipal Corporation
गडचिरोली: हत्ती स्थलांतरणाची लढाई आता न्यायालयात; वन पर्यावरण मंत्रालयाला नोटीस

तर, त्यात प्रामुख्याने ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने पावत्या छापून त्या पालिकेकडून प्रमाणित करणे बंधनकारक आहे. प्रमाणित नसलेल्या पावत्या ठेकेदाराला वसूल करता येत नाहीत. पण ठेकेदार केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या पावत्या प्रमाणित करून त्याच्याच बनावट पावत्या बनवून त्यावर वसुली करत आहेत. यामुळे पालिकेचा कोत्यावाधीचे उपन्न ठेकदार लाटत आहेत.

यांसदर्भात माहिती मनसे कार्यकर्ते प्रफुल जाधव यांनी महापालिका मुख्यालय येथे या संदर्भात माहिती मागवली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. ठेकेदाराने प्रमाणित केलेल्या बाजार कराच्या पावत्यांचा कोणताही अहवाल पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे पालिकेने सांगितले. तसेच कोणता ठेका कोणत्या ठेकेदाराला दिला याची सुध्दा पूर्ण माहिती नाहीत. पालिकेने वयक्तिक व्यक्तीला सदरचे ठेके दिले आहेत. सध्या पालिकेकडे २७ बाजार वसुलीचे ठेके आहेत. पण याचा कोणतेही अहवाल उपलब्ध नसल्याचे पालिकेने सांगितले.

हे देखील पहा-

शिवाय, २०१६ पासून कोणतीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही आहे. ठेकदार काही हेतुपुरसस्पर पालिका कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पालिकेच्या उत्पन्नावर डल्ला मारत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

वसई विरार महानगरपालिकेचे फेरीवाला धोरण अजूनही बासनात आहे. यामुळे शहरात फेरीवाले किती याचा कोणताही थांगपत्ता पालिकेला नाही आहे. यामुळे ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे फेरीवाले बसवून त्यांच्याकडून बेकायदेशीर वसुली करत पालिकेची लुट करत आहेत. ५० हजार हून अधिक फेरीवाले शहरात कार्यरत आहेत. यार्वांकडून पालिकेचे ठेकेदार वसुली करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com