उल्हासनगरमध्ये फुटपाथवर महापालिकेची धडक कारवाई

वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे साहित्य जप्त
उल्हासनगरमध्ये फुटपाथवर महापालिकेची धडक कारवाई
उल्हासनगरमध्ये फुटपाथवर महापालिकेची धडक कारवाईअजय दुधाणे

उल्हासनगर - शहरातील फुटपाथ काबीज करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या कपडा विक्रेते आणि हातगाडी विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली आहे. यावेळी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक हातगाडी आणि स्टॉल जप्त करण्यात आले.

हे देखील पहा -

शहरातील गोलमैदान ते नेहरू चौक, शिरू चौक, एक नंबर बस स्टॉप चौक आदी परिसरात या कारवाईला सुरुवात करण्यात आली. मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि वाहतूक पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली. शहरात वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून रस्त्यांच्या बाजूला अनधिकृतपणे अतिक्रमण वाढले आहे. वाहतूक सुरळीत सुरू राहावी म्हणून ही कारवाई करीत असल्याचे मनपा प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com