महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रामध्येच कचरा वर्गीकरणाची व्यवस्था केली पाहिजे!

मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर महापालिका डंम्पिंगवर केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया...
महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रामध्येच कचरा वर्गीकरणाची व्यवस्था केली पाहिजे!
महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रामध्येच कचरा वर्गीकरणाची व्यवस्था केली पाहिजे!प्रदीप भणगे

डोंबिवली : महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रामध्येच कचरा वर्गीकरणाची व्यवस्था केली पाहिजे असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले आहे. पाटील हे मलंगगड जवळील करवले गावात आले होते तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. वसुधैव कुटुंबकम् आध्यत्मिक संस्थान आयोजित राम कृष्ण हरी सप्ताहाच्या दीपोत्सव हा कार्यक्रम मलंगगड जवळील करवले गावात भरवला होता. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित लावली. कार्यक्रमला वारकरी आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

हे देखील पहा :

तसेच आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई , आमदार गणपत गायकवाड, मा.उपमहापौर मोरेश्वर भोईर, १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र वारे, जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील , नाऱ्हेण ग्रामपंचायत उप सरपंच समीर भंडारी , मनसेचे संतोष पाटील आणि रोहिदास मुंडे आदि मान्यवर सुद्धा उपस्थित होते.

उल्हासनगर महापालिकेच्या कचरा वर्गीकरणासाठी शासनाने उसाटने येथे उपलब्ध करून दिली आहे. मुबंईच्या करचा वर्गीकरणासाठी करवले गावात जागा उपलब्ध करून दिली आहे आणि आता ठाणे महापालिकेने कचरा वर्गीकरणासाठी भांडार्ली गाव निवडले आहे.त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की भूमिपुत्रांसोबत संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.तिकडचा कचरा हा इथे आलंच नाही पाहिजे. उल्हासनगर, ठाणे आणि मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रामध्येच कचरा वर्गीकरणाची व्यवस्था केली पाहिजे असे सांगितले.

महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रामध्येच कचरा वर्गीकरणाची व्यवस्था केली पाहिजे!
ब्रेक फेल झाल्याने गाडी थेट नर्मदा नदीत जाऊन बुडाली!

वास्तूच्या मोबदल्यात आम्हाला वास्तू द्या, संस्थानाची मंत्र्यांकडे मागणी..

विरार-अलिबाग कॉरिडोर मार्गामध्ये करवले येथील वसुधैव कुटुंबकम आध्यत्मिक संस्थानाची ९५ % जागेसह इमारत जात आहे. त्यामुळे आम्हाला पैसा नको तर आम्हाला इमारत जशी आहे तशी अद्यावत जागेवर उपलब्ध करून देण्याची मागणी संस्थानचे अध्यक्ष प्रल्हाद महाराज शास्त्री यांनी केली आहे. यावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी देखील सांगितले आहे कि, राज्य शासनाने केंद्र शासनाच्या केलेल्या भूमी अधिग्रहण कायदा हा स्वीकारला आहे. या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे कि, एखाद्याच घर शासकीय जागेवर जरी असलं तरी त्याला घराचा मोबदला दिला पाहिजे जागेचा मोबदला मिळणार नाही. पण जर याचा सर्व्हे करताना आणि रेकॉर्डवर जर आलं त्याचा विचार केला जाऊ शकतो.

महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रामध्येच कचरा वर्गीकरणाची व्यवस्था केली पाहिजे!
पुणे सहकार विभाग महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल !

मला त्यांनी निवेदन दिलेले आहे मी त्यांना सांगितले आहे , कि जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन द्या यांच्यामध्ये लक्ष घालून हे चांगलं काम आहे. २० विद्यार्थी ध्यात्मिक शिक्षण घेतात १०० विद्यार्थी करण्याचा त्यांचा संकल्प आहे. इथे गो शाळा आहे. या सर्व गोष्टी समाजाच्या हिताच्या आहेत. समाजाच्या हिताच्या काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहणारीच काम आपण केलं पाहिजे अशी भूमिका माझी असल्याचं मत मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसेच याबाबत पाठपुरावा करेन आणि माझं योगदान देईल असे पाटील यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com