धक्कादायक! सोन्याच्या चेनवरून मित्राची हत्या

मित्र आपल्या आयुष्याला वेगळे वळण लावतात. मित्र आपल्या चांगल्या वाटेवर देखील पाठवत असतात.
धक्कादायक! सोन्याच्या चेनवरून मित्राची हत्या
धक्कादायक! सोन्याच्या चेनवरून मित्राची हत्याSaam Tv

कल्याण : मित्र Friends आपल्या आयुष्याला वेगळे वळण लावतात. मित्र आपल्या चांगल्या वाटेवर देखील पाठवत असतात. संकटाच्या वेळेस देखील धावून येत असतात. भिवंडीत Bhiwandi २ मित्रांनी अल्पवयीन मित्राची हत्या केली आहे. मित्राच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. संबंधित घटना समोर आल्यावर परिसरात खळबळ उडाली आहे.

रोज एकत्र खेळणारी मित्र आपल्याच मित्राचा घात कसे करु शकतात? असा प्रश्न आता परिसरामधील नागरिकांकडून उपस्थित केल जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ देखील व्यक्त केल जात आहे. कल्याण जवळच भिवंडीच्या बापगाव Bapgaon परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मित्राने दीड तोळे सोन्याच्या चैनीकरिता एका निष्पाप अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचे, धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणात पडघा पोलिसांनी २ तरुणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरले आहे. कल्याणजवळील बापगावमधील साईधाम कॉमप्लेक्स आहे. साईधाम कॉम्पलेक्स मध्ये राहणारा सोहम एकनाथ बजागे हा अचानकपणे बेपत्ता झाल्याने, सोहमचे नातेवाईक सोहनचा शोध घेण्यास सुरवात केली. ३ तास शोध घेतल्यावर सहित तो सापडला नाही.

धक्कादायक! सोन्याच्या चेनवरून मित्राची हत्या
अकोल्यात जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या!

यानंतर शोध घेत असताना, त्याचा मृतदेह त्याच इमारती मधील तळ मजल्यावर बंद प्लॅटमध्ये आढळून आला आहे. त्याच्या तोंडावर स्पंजचे गोठोडे ठेवण्यात आल होत. या घटनेची माहिती मिळताच पडघा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. लहान मुलाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. पडघा पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिनेश कटके यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.

सोहमची हत्या त्याच परिसरामधील राहणारा अक्षय वाघमारे व एका लहान मुलाने केले आहे. हे दोघेही सोहमचे मित्र होते. सोहमच्या गळ्यात दीड तोळ्याची सोन्याची चैन होती. या दागिन्यावर त्या २ मित्रांचा डोळा होता. ती चैन घेण्याकरिता हा प्रकार घडला आहे. सोहम आई वडिलांचा एकूलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी देखील आहेत, अशी माहिती दीनेश कटके यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com