पुण्याचे भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट? (व्हिडिओ)

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे
पुण्याचे भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट? (व्हिडिओ)
धीरज घाटे- Saam Tv

पुणे : आगामी निवडणुका Elections डोळ्या समोर ठेऊन भाजपचे BJP नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट Murder Plot उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BJP Pune Corporators muder plot unearthed

विकी उर्फ वितुल वामन क्षिरसागर , मनोज संभाजी पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी) या दोघांसह त्यांच्या तीन ते चार साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धिरज घाटे यांनी फिर्याद दिली आहे.

घाटे शुक्रवारी दुपारी चहा पिण्यासाठी येथील शेफ्रॉन हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांचा जुना कार्यकर्ता विकी क्षीरसागर हा देखील त्याच्या काही साथीदारांसोबत तेथे आला होता. घाटे यांचे कार्यकर्ते त्याच्याबरोबर संपर्क ठेवत नाहीत, बरोबर जात नाहीत म्हणून तो मागील काही दिवसापासून रागात होता.

दरम्यान आगामी कालावधीत होणार्‍या महापालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणूकीत त्याचा भाऊ राकेश क्षीरसागर हा सहज निवडून यावा म्हणून चार ते पाच साथीदारांना एकत्र करून घाटे यांच्या खूनाचा कट रचून शेफ्रॉन हॉटेलमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला होता.BJP Pune Corporators muder plot unearthed

या प्रकरणातल्या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान तीन वेळा त्यांनी आपली हत्या करण्याचा कट रचला होता, मात्र तो असफल ठरला. गेल्या 15 दिवसापासून हे लोक आपल्यावर पाळत ठेऊन होते असे घाटे यांनी सांगितलं.

Edited By - Amit Golwalkar

धीरज घाटे
शिवसेना नेते अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com