Nupur Sharma News: नुपूर शर्मा, जिंदाल यांच्याविरोधात राज्यातील अनेक भागात निदर्शने

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी राज्यभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत.
protest against nupur sharma
protest against nupur sharma Saam tv

मुंबई : पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणावरून मुस्लिम समाजाकडून राज्यभरातील अनेक भागात जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून राज्यभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत. यावेळी निदर्शकांकडून नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची (Arrest) मागणी करण्यात येत आहे.

protest against nupur sharma
Nupur Sharma News: नुपूर शर्मा, जिंदाल यांच्याविरोधात दिल्ली, महाराष्ट्रात निदर्शने; अटकेची मागणी

आज देशातील दिल्लीच्या जामा मशिद, कोलकाता, उत्तर प्रदेशमधील अनेक भागात जोरदार निदर्शने करण्यात आली. तर राज्यात अहमदनगर, जालना , पनवेल, रायगड, सोलापूर, औरंगाबाद (Aurangabad) आणि सातारा (Satara) आदी ठिकाणी निदर्शने सुरु आहेत. या निदर्शकांकडून नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना कठोर शिक्षा व्हावी. तसेच लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी साताऱ्यातही मुस्लिम (Muslim) समाजाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये मुस्लिम बांधवाकडून शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.

protest against nupur sharma
कोलकाता: पोलीस कर्मचाऱ्याने केला अंदाधुंद गोळीबार; महिलेचा मृत्यू, त्यानंतर...

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद अहमदनगरमध्येही उमटले आहेत. अहमदनगरमध्ये मुस्लिम समाजाकडून बंदची हाक देण्यात आली. यावेळी अहमदनगरमध्ये मुस्लिम बांधवांकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण देशासहित जगभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत'. 'सामाजिक वातावरण गढूळ आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नुपूर शर्मांवर गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करून शिक्षा देण्यात यावी', असेही या निवेदनात म्हटले आहे.

सोलापूरमध्येही नुपूर शर्मांच्या विरोधात मोर्चा

सोलापुरात एमआयएमने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात मोर्चा काढला. शर्मा आणि जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दींच्या नेतृत्वात हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com