Politics : भाजपने केलं तेच मविआने केलं; नामांतराच्या निर्णयाला अबू आझमींचा विरोध

Abu Asim Azmi Latest News : या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमांना महाविकास आघाडीकडून फसवणूक आणि बाजूला सारल्याचे जाणवले आहे" असं ट्विट अबू आझमी यांनी केलं आहे.
Abu Asim Azmi Latest News
Abu Asim Azmi Latest NewsSaam Tv

मुंबई: काल रात्री, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. मात्र याअगोदर ठाकरे सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले, यापैकी एक म्हणजे नामांतर. ठाकरे सरकारने औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामांतर करत संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशीव केले. यामुळे अनेक वर्षांची मागणी ठाकरे जाता-जाता मार्गी लावली. मात्र यावर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Asim Azmi) यांनी नांमांतराच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला विरोध केला आहे. (Abu Asim Azmi Latest News)

हे देखील पाहा -

आमदार अबू आझमी म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याच्या निर्णयाचा मी निषेध करतो आणि मुस्लिम आरक्षणाकडेही दुर्लक्ष करण्यात आले. आमचा पाठिंबा कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत आहे पण आता महाविरास आघाडीसुद्धा तेच करत आहे जे भाजप करते . मी शरद पवार, अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना मला असे सांगायचे आहे की, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमांना महाविकास आघाडीकडून फसवणूक आणि बाजूला सारल्याचे जाणवले आहे" असं ट्विट अबू आझमी यांनी केलं आहे.

राज्यात औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रित आहे. शिवसेनेच्या (Shivsena) वतीने संभाजीनगरची हाक दिल्यानंतर पण सत्तेत आल्यानंतर संभाजीनगर नामकरण करणार असं आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचेही दिसून आले. मात्र, आता राज्य सरकार कोसळण्याच्या काही तास अगोदर ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Abu Asim Azmi Latest News
Eknath Shinde Latest News: शिंदे गटातील 'या' नेत्यांना मिळणार मंत्रिपदी बढती

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai international Airport) दि. बा. पाटील यांचे नाव देणार असल्याचाही निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नवी मुंबई येथील भूमिपुत्रांनी भेट घेतली होती. यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) हे आश्वासन दिलं होतं. त्यानुसार काल, बुधवारी मविआ सरकारच्या शेवटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com